राज्यात मराठी भाषा शिकविणे अनिवार्य,अन्यथा दंडात्मक कारवाई

    22-Jul-2019
Total Views | 42


 

 
पुणे: राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करावे, अशा प्रस्तावित कायद्याचा मसुदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेस्थळावर सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी शिक्षण कायद्यात मराठी अनिवार्यतेविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळेच्या मुख्यध्यापक व व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तरतूद आहे.
 
 

त्यात दोन टप्पे असून पहिल्या उल्लंघनात पाच हजार रुपये आणि दुसऱ्या उल्लंघनात सक्तीची ताकीद व १० हजार रुपये आकारण्यात यावेत,असे नमूद आहे. तरीही शाळा व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास त्या संस्थेची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे,असे मसुद्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, मराठी बोलण्यास किंवा त्यासह अन्य काही भाषा बोलण्यास निर्बंध लादणारे कोणतेही फलक वा सूचना शाळेत लावू नये, वा त्यासंबंधी कोणतेही अभियान राबवू नये, अशी तरतूद मसुद्यात आहे. प्रत्येक शाळा मराठीच्या अध्ययनासाठी राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेल्या पाठ्यपुस्तकांचा वापर करेल, अशा विविध मुद्द्यांचा मसुद्यात समावेश आहे.

 
 
मराठी भाषेच्या विकासासाठी व शिक्षण कायद्याच्या निर्मितीसाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सहकार्याने शाळांमध्ये मराठीचे सक्तीचे अध्यापन व अध्ययनहा शीर्षकांतर्गत मसुदा तयार केला आहे. याविषयी नुकतीच शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासोबत बैठक झाली. शिवाय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथेही या संदर्भात बैठक झाली असून आता हा मसुदा सूचना व हरकतींसाठी या संकेतस्थळावर १५ ऑगस्टपर्यंत खुला करण्यात आला आहे.
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121