भारताचे अभिमानास्पद पाऊल ; 'चांद्रयान २'चे यशस्वी प्रक्षेपण

    22-Jul-2019
Total Views | 83



श्रीहरीकोटा : सोमवारची दुपार ही जगभरातील भारतीयांसाठी आनंदाची ठरली. अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२चे सोमवारी (२२ जुलै) प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. चांद्रयान-२ हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने २००८मध्ये चंद्रयान १चे प्रक्षेपण केले होते.

 

अशी असेल चांद्रयान २ची पुढची वाटचाल...

 

- चंद्रापासून ३० किलोमीटरवर गेल्यानंतर 'चांद्रयान-२'ची गती कमी करण्यात येईल.

- भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यशस्वी झाल्यास भारत जगातला चौथा देश ठरणार आहे.

- पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतके आहे.

- चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील.

- चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल.

- त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल.

- त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.

- लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल.

- रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे ४ तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल.

- यानंतर पुढील १५ मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.

 

ही आहेत चांद्रयान २ची वैशिष्ट्ये

 

- चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे

- भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगले उदाहरण ठरणार आहे.

- चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121