नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे ट्विटर खाते सुरू करण्यात आले आहे. भागवत यांचे @DrMohanBhagwat हे अधिकृत खाते असून ते व्हेरिफाय झालेले आहे. रा. स्व. संघाच्या अधिकृत ट्विटर खात्याला ते फॉलो करत आहेत. तर त्यांच्या फॉलोवर संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आजच काढलेल्या या अकाउंटला बघता बघता १४ हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स मिळाले आहेत.
सध्या देशात सोशल मीडियाचे वारे वाहत असताना अनेक प्रतिष्टीत व्यक्तींची सोशल मीडिया अकाउंट्स आपण आजकाल बघतो मात्र काही वेळा त्यांची फेक अकाउंट्स देखील तयार केली जातात. त्यामुळे जनतेची दिशाभूल होण्याचा संभव बऱ्याचदा निर्माण होतो. त्यासाठी ट्विटर अशा पब्लिक फिगर्सना ब्लु टिक ची सुविधा देते, जेणेकरून अधिकृत खाते आणि अन्य खाती यामधील फरक लोकांच्या लक्षात येतो.
दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या अकाउंटचा जनतेशी संवाद साधण्यासाठी कशा तर्हेने उपयोग करून घेतात हे येत्या काळात सर्वांनाच दिसेल.