साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यंदाचे मानकरी

    14-Jun-2019
Total Views | 50


 

मुंबई : साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीचे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठीमध्ये सलीम मुल्ला यांना 'जंगल खजिन्याचा शोध' या कादंबरीसाठी बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' काव्यसंग्रहास युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.


 
 
 
साहित्य अकादमीने २३ भाषांसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात ११ कविता संग्रहाला, ६ कथा संग्रहाना, ५ कादंबरी आणि एका पुस्तक परीक्षणाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. तर २२ लेखकांना बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांना सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख दिली जाणार आहेत. 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121