... मग घुंगटबंदीही करा : जावेद अख्तर

    03-May-2019
Total Views | 52



नवी दिल्ली : बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे, अशी भूमिका प्रसिद्ध गीतकार आणि पुरोगामी विचारवंत जावेद अख्तर यांनी मांडली आहे. श्रीलंकेत साखळी मानवी बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांना बुरख्यावर बंदी घातली आहे. यानंतर भारतातमध्ये बुरखा बंदी घालण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या गोष्टीवर राजकीय वाद देखील सुरू आहे.

 

"बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या ६ मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी." असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचे मत नोंदवले आहे.

 

"बुरख्याबाबत माझे ज्ञान खूपच कमी आहे. याचे कारणही आहे. ज्या घरात मी राहिलो त्या घरातील सर्व महिला या कामावर जाणाऱ्या होत्या. मी कधीही माझ्या घरात बुरखा पाहिलेला नाही. इराक हा मोठा कट्टर देश आहे. मात्र, तिथे महिला आपला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्या नुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा, मात्र चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले." असे अख्तर म्हणाले.

 
 
 

"येथे ( भारत) जर तुम्हाला कायदा (बुरखा परिधान करण्यावर प्रतिबंधासाठी) हवा असेल आणि जर कुणाचे तसे मत असेल तर मला त्या बाबत काहीही आक्षेप नाही. मात्र, राजस्थानमधील मतदान होण्यापूर्वी तेथे कुणीही घुंगट घालणार नाही अशी घोषणा केद्र सरकारने करावी. मला तर असे वाटते की बुरखाबंदीही व्हावी आणि घुंगटबंदीही व्हावी." असे जावेद अख्तर यानी म्हटले होते. मात्र, आपला मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगत अख्तर यांनी आपले म्हणणे ट्विटरद्वारे स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121