नवी दिल्ली : पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-१६ या विमानाला पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अडीच महिन्यांनंतर पुन्हा सेवेत परतले आहेत. राजस्थानमध्ये एअरबेसमध्ये त्यांची पोस्टींग करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी विमानावर प्रतिहल्ला करताना विंग कमांडर यांनी सीमारेषा ओलांडली होती. त्यांना पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर साठ तासांत ते भारतात परतले होते.
काही दिवसांपूर्वी अभिनंदन यांचा सहकाऱ्यांसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात अभिनंदन मित्रांसह दिसत होते. त्यावेळी त्यांची बदली पोस्टींग काश्मिरमध्ये झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांची पोस्टींग सध्या राजस्थानमध्ये करण्यात आली आहे. अभिनंदन यांच्या बदलीची माहीती गोपनीय आहे. त्यामुळे याबद्दल आणखी माहिती देता येणार नसल्याचे ते म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat