इंदोर : काँग्रेसचा स्टार प्रचारक नवज्योज सिंग सिद्धू सध्या आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो. याच वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्याला तीन दिवसांची प्रचारबंदी झाली होती तसेच एका महिलेची चप्पलही खावी लागली होती. इंदोर येथे बोलताना सिद्धू पुन्हा एकदा बरळला असून भाजप हा काळ्या लोकांचा पक्ष असल्याचे तो म्हणाला. यामुळे सिद्धूने पुन्हा एकदा स्वतःभोवती वाद ओढवून घेतला आहे.
काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे ज्याने देशाला स्वतंत्र मिळवून दिले. हा पक्ष मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांचा आहे. या महान व्यक्तींनी देशवासियांना गोऱ्यांपासून मुक्त केले. आता तुम्ही इंदोरवाले काळ्या इंग्रजांपासून देशाला आझादी द्या, असे सिद्धू शुक्रवारी इंदोर येथील एका प्रचार सभेत बोलताना बरळला. यानंतर त्यावर चोहूबाजूने टीका करण्यात येत आहे.
'मोदी जी काले हैं तो क्या हुआ, गरीबों के रखवाले हैं।'
सिद्धू ने मोदी जी और हिन्दुस्तानियों को काला अंग्रेज कहा है।
— BJP (@BJP4India) May 11, 2019
मैं आपसे पूछता हूं, मोदी जी काले अंग्रेज और सोनिया जी हिंदुस्तानी? ये कहां का न्याय है?
मोदी जी काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं, मोदी जी काले हैं तो क्या हुआ गरीबों के रखवाले हैं: डॉ @sambitswaraj #DeshKeDilMeiModi pic.twitter.com/PXQqmETHps
सिद्धूच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी सिद्धू आणि काँग्रेसला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. मोदीजी काळे असले म्हणून काय झाले, ते तर गरिबांचे रक्षणकरते आहेत. सिद्धू तुम्ही पंतप्रधान मोदींची तुलना काळ्या इंग्रजांशी करता मग सोनिया गांधी हिंदुस्थानी आहेत का? असा सवाल पात्रा यांनी विचारला. याचवेळी काँग्रेसचा हा इटालियन रंग येत्या २३ मेच्या निकालानंतर उतरणार असल्याचाही टोला त्यांनी लगावला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट..