श्रीलंकेत कोलंबोजवळ पुन्हा स्फोट

    25-Apr-2019
Total Views | 69


कोलंबो : आत्मघाती बॉम्ब हल्ल्याने हादरलेल्या श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने साऱ्यांचा थरकाप उडाला आहे. राजधानी कोलंबोपासून ४० किमी दूर असलेल्या पुगोडाजवळ स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

पुगोडातील स्थानिक कोर्टाच्या इमारतीजवळील मोकळ्या जागेवर हे स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र, हे स्फोट नेमके कशामुळे झाले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.

रविवारी, 'ईस्टर संडे'च्या दिवशी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३५९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर पाचशे जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी ईसीस या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या हल्ल्या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला असून काहींना अटक करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121