अद्ययावत महाड बसस्थानकामुळे कोकणच्या विकासात भर - अनंत गिते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019
Total Views |


 

अलिबाग : महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एस.टी. बसस्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी महाड येथील नूतन एसटी स्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केला.


यावेळी आमदार निरंजन डावखरे
, भरतशेठ गोगावले, प्रवीण दरेकर, प्रांताधिकारी इनामदार, तहसीलदार पवार, एस.टी.विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के, महाड पं. स. सभापती सपना मालुसरे, महाडचे उपनगराध्यक्ष वजीर कोंडीवकर, महाड आगारप्रमुख कुलकर्णी उपस्थित होते. गिते यांनी सांगितले की, भारतातील उत्तम परिवहन सेवा देण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाडकरांची गेल्या अनेक वर्षांपासून कोकण रेल्वे महाड शहराला जोडण्याची असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहे. साईडींग मंजूर झाल्यानंतर पेण-अलिबागच्या धर्तीवर महाडकरीता स्वतंत्र प्रवासी वाहतूक सुरू करता येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@