निनाद मांडवगणे अनंतात विलीन

    01-Mar-2019
Total Views |


 


नाशिक : जम्मू-काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झालेले स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निनाद यांच्या वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिला. अंत्ययात्रेमध्ये नाशिककरांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

 

अंत्ययात्रेमध्ये 'भारत माता की जय', 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'शहीद जवान निनाद अमर रहे' अशा घोषणा देण्यात आल्या. वीरपत्नी विजेता आणि त्यांच्या चिमुकल्याकडे बघून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. परिसरात सर्वत्र शोकाकूल वातावरण होते. निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

 

"युद्ध काय असते तुम्हाला माहित नाही, आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहित नाही. आणखी निनाद जाता कामा नये." अशीही भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली. "निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, फेसबुकवरील योद्ध्यांना माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. यातून काही होणार नाही. तुम्हाला खरंच काय करायचे असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या." असा सल्ला हुतात्मा स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नीने दिला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
तिसऱ्याची बदनामी नकोच; ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले ; पंतप्रधान मोदींची फोनवर 35 मिनिटे चर्चा ; गोळीचे उत्तर तोफेच्या गोळ्यानेच देणार

तिसऱ्याची बदनामी नकोच; ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले ; पंतप्रधान मोदींची फोनवर 35 मिनिटे चर्चा ; गोळीचे उत्तर तोफेच्या गोळ्यानेच देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. 18 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुमारे 35 मिनिटे दूरध्वनीवर संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मिस्री यांनी स्पष्ट केले की, “या संपूर्ण प्रक्रियेत भारत-अमेरिका व्यापार करार किंवा मध्यस्थीविषयी कुठेही कोणतीही चर्चा झाली नाही. सैन्य कारवाई थांबविण्याविषयी चर्चा थेट भारत आणि पाकिस्तानमधील ..

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात 'ब्लॅक बॉक्स'चेही नुकसान! डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेत पाठवणार?

(Air India Plane Crash) एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला निघालेल्या AI 171 बोइंग ड्रीम लायनर 787 या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या मिनिटांतच ते विमानतळाजवळील नागरी परिसरात कोसळले. या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहितीचा उलगडा होणे गरजेचे आहे. मात्र भीषण स्फोटात ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाल्यामुळे भारतात त्याच्यातील माहिती मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता हा ब्लॅक बॉक्स विश्लेषणाकरिता अमेरिकेत पाठविला जाणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121