'मन की बात'मधून वाहिली वीरपुत्रांना आदरांजली

    24-Feb-2019
Total Views |



 

'आता मन की बात निवडणुकीनंतर'


नवी दिल्ली : "१० दिवसांपूर्वी भारतमातेने अनेक वीरपुत्रांना गमावले. यामुळे देशातील जनतेमध्ये दुःखाचे आणि संतापाचे वातावरण आहे. हुतात्म्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती भावना व्यक्त करण्यात आल्या. देशात याची एक भावनिक लाट तयार झाली. सुरक्षा दलांनी अतुलनीय धैर्याचे पुन्हा एकदा दर्शन घडवले. तसेच, देशाने शांतता पुनर्प्रस्थापित करण्याच्या क्षमता दाखवून दिली." अशी भावनिक साथ घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाच्या ५३व्या भागाची सुरुवात केली.

 

"या वीरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या देशभक्ती, त्याग, तपश्चर्येचा तरुणांनी विचार करावा. त्यातून प्रेरणा घ्यावी. मी त्यांना विनम्र प्रणाम करत आहे. आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे सैन्य आणि देशाला लोकार्पण करण्यात येणार आहे. हे राजधानी दिल्लीमध्ये अमर जवान ज्योती आणि इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. हे देशवासियांसाठी वीरांच्या स्मृतींनी पवित्र झालेले तीर्थस्थळ आहे." असे म्हणत पंतप्रधान मोदींनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

 

देशभरात सध्या १०वी तसेच १२वींच्या परीक्षेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. निरोगी लोकशाही परंपरेचा सन्मान करत पुढील मन की बात मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकी नंतर आता 'मन की बात' होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121