या तर चोरांच्या उलट्या बोंबा : आशिष शेलार

    05-Dec-2019
Total Views | 186
Ashish_1  H x W
 


मुंबई : "आपल्या सोबतच्या अपक्ष आमदारांना वारेमाप आश्वासने देऊन साधा खातेवाटपाचा प्रश्न मार्गी लावू न शकलेले भाजप आमदार फुटीचा दावा करत आहेत. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.", असा सणसणीत टोला भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाविकास आघाडीतच अपक्ष आमदार हे अस्वस्थ आहेत. ती अस्वस्थता लपवण्यासाठी आता भाजपवर आरोप केले जात आहेत, असेही शेलार म्हणाले.

भाजपचे डझनभर आमदार व एक राज्यसभेतील खासदार नाराज आहेत, अशा आशयाची बतावणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. आमदार शेलार यांनी गुरुवारी याचा समाचार घेतला. ही निव्वळ अफवा असून भाजप एकसंध आहे, इथे कुणीही नाराज नाही, सर्व आमदार पक्षशिस्त पाळणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाअध्यक्ष अमित शाह, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वावर त्यांना पूर्ण विश्वास आहे. फडणवीस सरकारने केलेल्या कामांद्वारे प्रभावित होऊन हे आमदार आमच्या सोबत आले ते भाजपमध्येच राहतील, असेही ते यावेळी म्हणाले.

"याऊलट महाविकास आघाडीतील आमदारांवर त्यांच्या नेत्यांचा विश्वसा नसल्याने त्यांना बहुमत सिद्ध होईपर्यंत डांबून ठेवण्यात आले होते. मोठमोठी आश्वासने त्यांना देण्यात आली मात्र, आता या सरकारमध्ये तसे काहीच होत नसल्याने त्यांच्यासोबत असलेले आमदारच नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी ती चिंता करावी," असा टोला त्यांनी हाणला.


अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121