नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हरसिटी उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रगतीबरोबरच वनवासी लोकसंख्या असलेल्या या भागाच्या विकासावरही विद्यापीठ विशेष भर देत आहे हे पाहून आनंद होत आहे अशा भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केल्या. मेघालयातील शिलांग येथे नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीच्या (एनईएचयू) २६ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांनी आज संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
एनईएचयू सारख्या उच्च शिक्षण संस्था सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची साधने असू शकतात. एनईएचयूच्या पुढाकाराने मेघालयला मानव विकास निर्देशांकांवर अधिक चांगले स्थान मिळविण्यास मिळू शकते असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मेघालयातील ८० टक्क्यांहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे मेघयालयातील कृषी उत्पादकतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात एनईएचयू महत्वाची भूमिका बजावत आहे. तसेच मेघालयाच्या उत्तर-पूर्व सामाजिक-आर्थिक विकासास प्रोत्साहित करण्यासाठी देखील महत्वाचे काम करत आहे. ‘ग्रामीण विकास आणि कृषी उत्पादन’, ‘कृषि व्यवसाय आणि अन्न तंत्रज्ञान’ आणि ‘फलोत्पादन’ विभाग या सर्व विषयांमध्ये अभ्यास करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी एनईएचयूमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांना केले.
समाज आपल्याला जेवढे देतो तेवढेच समाजाला परत देणे हे आपले कर्तव्य आहे असा कानमंत्र देखील राष्ट्रपती कोविंद यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
Watch LIVE as President Kovind addresses the 26th Convocation of North-Eastern Hill University (NEHU) in Shilong https://t.co/p0MzOGfNC2
— President of India (@rashtrapatibhvn) November 4, 2019
Watch LIVE as President Kovind addresses the 26th Convocation of North-Eastern Hill University (NEHU) in Shilong https://t.co/p0MzOGfNC2
— President of India (@rashtrapatibhvn) November 4, 2019