अल्पसंख्याकवादाचे विच्छेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2019
Total Views |





भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीसमोर हा प्रश्न चर्चेत आला नसता तरच नवल झाले असते
. सर्वधर्मसमभाव उपजतच रक्तात असलेल्या भारतीयांच्या तेव्हाच्या नेतृत्वाने घटनेत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला धरून कलम क्र. २५ ते ३० ते अंतर्भूत केली गेली. त्यातून बोकाळलेल्या अल्पसंख्याकवादाचा गेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा अशोक भिडे यांनी या पुस्तकात घेतला आहे.



अल्पसंख्याकवाद
’ म्हणजे नेमके काय, तो कसा अस्तित्वात आला आणि गेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या काळात तो भारतात कसा फोफावला, याचा सविस्तर आढावा घेणारे ‘Minoritism : Perpetual Threat to Nation’ हे पुस्तक आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर विशेष करून ज्यू समाजाच्या वांशिक निर्मूलनामुळे जगात अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात नवे चिंतन सुरू झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीसमोर हा प्रश्न चर्चेत आला नसता तरच नवल झाले असते. सर्वधर्मसमभाव उपजतच रक्तात असलेल्या भारतीयांच्या तेव्हाच्या नेतृत्वाने घटनेत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला धरून कलम क्र. २५ ते ३० ते अंतर्भूत केली गेली. त्यातून बोकाळलेल्या अल्पसंख्याकवादाचा गेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा अशोक भिडे यांनी या पुस्तकात घेतला आहे.



हे पुस्तक चार भागात आहे
. पहिल्या भागात अल्पसंख्याकवादाची सुरुवात आणि अल्पसंख्याकांचे पाच प्रकारात वर्गीकरण कसे केले गेले (पृ.१-३८) ते दिले आहे. भारतात भिडे अल्पसंख्याकवादाचे मूळ १८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर लगेच १८५८ पर्यंत नेतात. त्यात अल्पसंख्याकांच्या मनोप्रवृत्तीवर नेमके बोट ठेवतात. अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांपासून स्वत:चे वेगळे अस्तित्व जपण्याची जाणीव या दरम्यान दृढ होऊन, त्या आड स्वत:साठी वेगळे आणि अधिक हक्क आणि विशेष अधिकार मागत राहण्याची मनोवृत्ती निर्माण झाली. (पृ. १२) दुसर्‍या भागात अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान, ब्रिटिशांचे ‘फोडा आणि झोडा’ धोरण आणि भारतीय नेतृत्व त्याला कसे बळी पडत गेले, याचा आढावा (पृ. ३९-१०८) घेतला आहे. अनेक नेत्यांच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत असलेल्या विचारांची माहिती, तसेच अल्पसंख्याकांना धरून काही समित्यांचे अहवाल त्या काळातील घटनांची आणि अल्पसंख्याकांच्या बदलत्या मनोवृत्तीची पार्श्वभूमी स्पष्ट करते. तिसरा भाग घटना समितीत झालेल्या चर्चा आणि त्यातून अल्पसंख्याकांसाठी कलमे कशी घातली गेली याची सविस्तर माहिती देतो. अल्पसंख्याकांना दिलेल्या या सर्व सुखसोयी आणि सुविधांमुळे ते बहुसंख्याकात एकरूप न होता, आपले वेगळे अस्तित्व जपण्याच्या धोरणाकडे झुकले.



चौथा भाग स्वातंत्र्योत्तर काळात अल्पसंख्याकवाद केवळ राजकीय स्वार्थापोटी कसा जोपासला गेला
, अल्पसंख्याकांचे तुष्टिकरणच नव्हे, तर लांगूलचालन करण्यात काही पक्ष कसे आतुर होते, याची माहिती आली आहे. एक महत्त्वाची गोष्ट भिडे नमूद करतात की, अल्पसंख्याकांकडून कधीही अशा समित्या अथवा लवाद स्थापन करण्याची मागणी केली गेली नव्हती. (पृ.२१६) विशेष करून मुस्लीम तुष्टीकरणासाठी हे सर्व करण्यात आले. राष्ट्रीयस्तरावर अंमलात आलेला अल्पसंख्याक कायदा १९९२, रंगनाथ मिश्रा लवाद आणि साचर समिती इ. नेमताना त्यातून अल्पसंख्याकांची मते कशी वळविता येतील, हेच धोरण त्या मागे असल्याचे भिडे निर्भीडपणे नोंदवतात. त्यातून सीमेवरील राज्यांमध्ये निर्माण झालेल्या आणि देशाला घातक ठरलेल्या समस्यांचा आढावा घेतात. अल्पसंख्याकवादाची योग्य समीक्षा भिडे यांनी या पुस्तकात केली आहे. अल्पसंख्याकवाद ऐतिहासिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.



- डॉ. प्रमोद पाठक 





पुस्तकाचे नाव
: Minoritism : Perpetual Threat to Nation

लेखक : अशोक भिडे

प्रकाशक : परममित्र प्रकाशन, ठाणे

पृष्ठसंख्या : २४४

मूल्य : ४००

@@AUTHORINFO_V1@@