रिलायन्स कंपनीचा पुन्हा एक नवा विक्रम !

    29-Nov-2019
Total Views | 62



मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अधिपत्याखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी पुन्हा एक नवीन इतिहास रचला. रिलायन्स इंडस्ट्रीज १० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. पेट्रोलपासून ते दूरसंचारपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचे बाजार भांडवल गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर १०,०१, ५५५.४२ कोटी रुपये (१३९.८ अब्ज डॉलर) झाले. गुरुवारी सकाळी १०.२५ वाजता मुंबई शेअर बाजारात कंपनीने १०,००,६०४.५५ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलांची नोंद केली. विशेष बाब म्हणजे या वर्षी कंपनीच्या शेअरच्या किमतीत जवळपास ४१ टक्के वाढ झाली आहे, तर सेन्सेक्समध्ये याच कालावधीत केवळ १४ टक्के वाढ झाली.

कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारी ०.६५ टक्क्यांनी वाढून १,५७९.९५ रुपयांवर बंद झाली. दिवसभराच्या व्यवहारात ती ०.९० टक्क्यांनी वाढून १,५८४ रुपयांवर गेले. कंपनीच्या शेअरची ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीने ९.५ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला होता. १८ ऑक्टोबरला ९ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद केली. कंपनीने अशा प्रकारे केवळ २७ सौद्यांच्या सत्रात आपल्या बाजार भांडवलात एक लाख कोटी रुपयांच्या वाढीची नोंद करत हे यश मिळवले आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने गेल्या काही दिवसांत टेलिकॉम आणि रिटेलसारख्या ग्राहकांशी निगडित क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीच्या बळावर कंपनीने चांगली कामगिरी केली.

अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121