ब्रेकिंग : अजित पवार पुन्हा गायब !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |




अजित पवारांकडून उपमुख्यमंत्री पदाची मागणी ?


मुंबई : महविकासआघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. राष्ट्रवादीसोबत बंड करणाऱ्या अजित पवार यांना मात्र आज कोणत्याही मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार नाही. आज सकाळपासूनच अजित पवार कोणालाही भेटले नाहीत, असे काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांशी त्यांचा आज संपर्क नसल्याने उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवारांची नाराजी समोर आली आहे.



उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षात परत आल्यानंतर अजित पवार यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री पदाची धुरा मिळावी अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातही विधानसभा अध्यक्ष निवडीवरून रस्सीखेच चालली असल्याचे दिसून येते. 
परंतु महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात गेल्याने आता जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना कोणते मंत्रिपद देण्यात येणार याबाबत पक्षप्रमुख शरद पवार यांनी कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तर मंत्रिपदाच्या वाटपाचे सूत्र ठरलेले असून मुख्यमंत्री पद शिवसेनेला , उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसला तर विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या मंत्रीपदाबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले कि, " महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अजित पवार यांच्या बाबतीत निर्णय घेतील."

@@AUTHORINFO_V1@@