'बळी” या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2019
Total Views |


जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बळीअसे या चित्रपटाचे नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर समाज माध्यमांवर अर्थात सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरहिट मराठी चित्रपट लपाछपीफेम विशाल फुरिया यांनी केले आहे.

'बळी' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते. सिनेमा २०२० साली प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टर ध्वनित करते. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे.

चित्रपटाचा नायक स्वप्नील जोशी म्हणाला, “यंदाच्या वर्षी प्रगल्भ मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांच्या नवनवीन प्रकारांना पाठबळ दिले आणि आपलेसे केले. त्यातील माझे एक छोटे योगदान म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसे आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच घाबरवूनसोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी याआधी मराठी लपाछपीचे दिग्दर्शन केले होते. तो त्यांचा पहिला चित्रपट होता आणि तो विशेष गाजला होता. त्याचबरोबर 'क्रिमिनल जस्टीस' या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शनदेखील विशाल फुरीया यांनी त्रिंगमांशू धुलिया यांच्याबरोबर केले होते.

मराठी प्रेक्षकांना लपाछपीखूप आवडला होता. प्रेक्षकांना हॉरर चित्रपटही आवडतात आणि ते त्यांना चांगला प्रतिसाद देतात हे या चित्रपटाने सिद्ध केले होते. म्हणून मला मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट करायचे आहेत. स्वप्निलसारखा प्रेक्षकांच्या गळयातील ताईत असलेला अभिनेता आणि अर्जुन व कार्तिक सारखे या क्षेत्रातील दिग्गज निर्माते यांचे माझ्या चित्रपटाला पाठबळ आहे. या जोरावर मी लपाछपीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक घाबरवणारा चित्रपट प्रेक्षकांना मिळेल, याची खात्री देतो,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी काढले.

'बळी'ची निर्मिती जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. मोगरा फुलला, विक्की वेलिंगकर, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती आणि भिकारीचित्रपटाची प्रस्तुती जीसिम्सने केली आहे. जीसीम्सहा महाराष्ट्रातील एक आघाडिचा स्टुडिओ असून चित्रपट निर्मिती आणि प्रस्तुती, टेलिव्हिजन निर्मिती, प्रतिभा व्यवस्थापन, चित्रपट विपणन आणि प्रसिद्धी तसेच उपग्रह संयोजन या क्षेत्रांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.

चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार म्हणाले, “एक नवीन प्रकार म्हणजे हॉरर चित्रपट हाताळताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. विशाल फुरियासारखा नावाजलेला हॉरर चित्रपट दिग्दर्शक आम्हाला त्यासाठी मिळणे, यासारखी आणखी चांगली गोष्ट काय असू शकते? त्यांनी दिग्दर्शित केलेला लपाछपीहा चित्रपट आज देशात अव्वल दहा हॉरर चित्रपटांमध्ये मोडतो. त्याशिवाय आजचा आघाडीचा हिरो स्वप्नील जोशी या चित्रपटात आहे. तो आम्हाला एका कुटुंब सदस्याप्रमाणे आहे. त्याच्यासाठीही ही त्याच्या आयुष्यातील एक वेगळी संधी आहे.

@@AUTHORINFO_V1@@