आरबीआयकडून दिवाळी भेट : कर्ज होणार आणखी स्वस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दिवाळी भेट दिली आहे. आरबीआयने रेपो रेट दरात ०.२५ अंशांची कपात केली आहे. या नव्या व्याजदर कपातीनंतर नवे व्याजदर आता ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने सुरू आर्थिक वर्षात व्याजदरात केलेली ही सलग पाचवी कपात आहे. आत्तापर्यंत व्याजदरात एकूण १.३५ टक्के कपात केली आहे.

 

रिव्हर्स रेपो रेटमध्येही ०.२५ अंशांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा दर ५.१५ टक्क्यांवरून ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक मुल्य निर्देशांक हा चार टक्के राहणार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. पतधोरण आढावा बैठकीत पाच सदस्यांनी व्याजदर कपातीचे समर्थन केले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विकासदर ६.९ टक्क्यांनी घसरून ६.१ टक्के इतका राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

गृह, वाहनकर्ज होणार स्वस्त

व्याजदर कपातीच्या निर्णयाचा फायदा आता सर्वसामान्यांना होणार आहे. एसबीआयसह अन्य सार्वजनिक बॅंकांनी आपले कर्जावरील व्याजदर घटवले आहेत. गृहकर्ज, वाहनकर्ज, उद्योगांना लागणाऱ्या कर्जांसह अन्य कर्जे आता स्वस्त होणार असल्याने दिलासा मिळणार आहे. करकपातीच्या निर्णयामुळे कर्जाच्या हप्त्यात घट होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@