मेट्रो स्थानकांवर यापुढे 'नो-प्लास्टिक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |




मुंबई, (विशेष प्रतिनिधी) - ’घाटकोपर-वर्सोवा’ या ’मेट्रो-१’ मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. मेट्रो स्थानकामध्ये यापुढे सिंगल युज प्लास्टिकची व्रिकी करणे आणि त्याच्या वापरावर बंदी असेल. राज्याच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या आदेशानुसार मेट्रो स्थानकांमध्ये प्लास्टिकबंदीचा निर्णय ’मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमेटेड’ने (एमएमओपीएल) घेतला आहे.

 
 

शासनाने एकदाच वापरात येणार्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यापुढे मेट्रो स्थानकांवरदेखील होणार आहे. मुंबईत ’घाटकोपर ते वर्सोवा’दरम्यान धावणार्‍या एकमेव मेट्रो मार्गिकेवरील सर्व स्थानके प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार ’एमएमओपीएल’ प्रशासनाने केला आहे. या मार्गिकेवर एकूण १२ स्थानके आहेत. या स्थानकांवर मोठ्या संख्येने विविध वस्तूंची किरकोळ दुकाने आहेत. शिवाय छोटेखानी उपाहारगृहे आहेत. या ठिकाणी सर्रासपणे एकदाच वापरात येणार्‍या प्लास्टिकचा वापर होतो. मात्र, ’एमएमओपीएल’ प्रशासनाने स्थानक परिसरात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणल्याने या दुकानदारांना अशा प्रकारचे प्लास्टिक वापरता येणार नाही. त्याला पर्याय म्हणून कागदी कप आणि कापडी-कागदी पिशव्या वापरण्याचा सल्ला प्रशासनाने दुकानदारांना दिला आहे.

 

 
स्थानकांवर दुकनदारांकडून विकण्यात येणाऱ्या २०० मिली लीटरच्या खालील पेट बाटल्यांना बंदी घालण्यात आली आहे. तर ५० मायक्रोन वरील जाडीच्या किमान दोन ग्रॅमवरील प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यावर मुभा असेल. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोलच्या डीश, चमचे, वाट्या, कप, ग्लास आणि स्ट्राॅ यांच्या वापरावर रोख असणार आहे. प्रवाशांना या वस्तू बाळगण्यात कोणत्याही प्रकारचे बंधन असणार नाही. केवळ स्थानकांवरील दुकानदारांना या वस्तूंची खरेदी-व्रिकी करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, शासनाने सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणल्याने प्रवाशांनीही अशा प्रकारच्या प्लास्टिक वस्तूंचा वापर न करण्याचे आवाहन 'एमएमओसीएल' प्रशासनाने केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@