'गुगल लोकेशन' सुरू आहे ! वेळीच सावध व्हा !

    30-Oct-2019
Total Views | 104


नवी दिल्ली : तुमच्या मोबाईल फोनमध्ये गुगल लोकेशन सुरू आहे का ? कारण गुगल तुमच्याबद्दलची माहिती गोळा करून ती माहिती चोरी केली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन रेग्युलेटरीतर्फे कंपनीने ग्राहकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याचा आरोप लावला जात आहे. हाच डेटा कंपन्यांना विकला जात असल्याचाही आरोप गुगलवर झाला आहे.

 

तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन सर्च करत असता त्यानंतर काही वेळाने गुगलद्वारे विविध कंपन्यांच्या जाहिरातींचे पॉपअप दिसतात, ही सामान्य बाब आहे. मात्र, आता गुगल तुमच्या लोकेशनच्या माहितीचीच चोरी करत आहे. जर गुगल लोकेशन बंद असेल तर तुमचा डेटा गुगलपर्यंत पोहोचू शकत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर तोही गैरसमजच आहे.
 

ऑस्ट्रेलियन कन्डीशन एण्ड कमिशनतर्फे दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यात गुगल ग्राहकांना भ्रमित करत असल्याचा आरोप केला आहे. गुगल लोकेशन हिस्ट्री डिसेबल केल्यानंतरही डाटा चोरी होत असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. गुगल लोकेशन काही अॅपमध्ये डिफॉल्ट असल्याने ही माहिती २०१७ ते २०१८ पर्यंत गोळा केली असल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. अशा डेटा चोरीबद्दल गुगलला मोठा दंड आकारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121