
न्या. शरद बोबडे येत्या काही दिवसात सरन्यायाधीशपदाचा कारभार हाती घेणार आहेत. त्यापूर्वी अनेक महत्वपूर्ण खटल्यांचे निकाल सुनावले जातील. सरन्यायाधीश रंजन गोगोइ निवृत्त होण्यापूर्वी ह्या खटल्यांचे अंतिम निर्णय जाहीर करावे लागणार आहेत. देशभरात चर्चेत राहिलेले हे खटले नेमके काय आहेत जाणून घेऊयात ..
१. शबरीमला
केरळमधील बहुचर्चित शबरीमला मंदिरात वयवर्षे १० ते ५० च्या वयोगटातील महिलांना प्रवेशाचा खटला आपण ऐकला असेल. काही पत्रकारांनी, संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करीत असताना, सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. शबरीमला मंदिर हे स्वामी अय्यप्पांचे असून तिथे ते 'नैष्ठिक ब्रह्मचर्य' मुद्रेत आहेत. त्यामुळे तिथल्या परंपरेचा भाग म्हणून शबरीमलाच्या प्रथेचा सम्मान केला जावा, अशी अपेक्षा होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र शबरीमला मंदिराचे दरवाजे सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले करण्याचे आदेश दिले. सुनावणी करणाऱ्या न्यायपीठावरील एकमेव महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी मात्र नकाराचे निकालपत्र लिहिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात यावर पुर्नविचारासाठी याचिका दाखल करण्यात आली. पुन्हा झालेल्या सुनावणीत सर्व युक्तिवाद संपून दीड वर्षे उलटली आहेत. काही दिवसात पुनर्विचार याचिकेवरील अंतिम निर्णय आता जाहीर करण्यात येईल.
राफेल मधील कथित घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च नायायालयाने गेल्या वर्षी फेटाळून लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरोप करण्यात यावे, असा याचिकाकर्त्यांचा आग्रह होता. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले होते. त्यावर पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालायातच दाखल करण्यात आली. पुनर्विचार याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. आता तो निर्णयही जाहीर केला जाणार आहे.
रामजन्मभूमी प्रकरणी गेले दीड महिना सुनावणी सुरु होती. अलालाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० साली राम्जान्म्भूमीची जागा तीन भागात विभागण्याचा निर्णय केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालायच्या त्या निर्णयाविरोधात सुन्नी वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्यावर प्राथमिक सुनावणी होऊन विषय घटनापीठाकडे सिपावण्याचा निर्णय झाला होता. ऑगस्ट २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणी सुरु होती. त्यावरील अंतिम निर्णयही आता जाहीर केला जाईल.
४. चौकीदार चोर है, राहुल गांधी, अवमान याचिका
२०१९ लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालायचा अवमान केल्याची घटना घडली होती. 'सर्वोच्च न्यायालय म्हणते चौकीदार चोर है', असे धादांत खोटे विधान राहुल गांधींनी केले होते. त्याविरोधात मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. रंजन गोगोई निवृत्त होण्यापूर्वी यावरही अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.