आता फेसबूकवर बातम्यांसाठी स्वतंत्र विभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : सोशल मीडिया नेटवर्कींग साईट असलेल्या फेसबूकवर आता गुगलप्रमाणेच बातम्यांसाठी स्वतंत्र सेक्शन देण्यात येणार आहे. या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी फेसबूकतर्फे जगभरातील माध्यम कंपन्यांशी भागिदारी करण्यात आली आहे. फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी एप्रिलमध्ये याबद्दल घोषणा केली होती.

 

एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, न्युज कॉर्प, न्युयॉर्क पोस्ट, द वॉशिंग्टन पोस्टसारख्या आघाडीच्या माध्यम समुहांसह भागीदारी करण्यात आली आहे. न्यूज टॅबद्वारे बातम्या युझर्सपर्यंत पोहोचवल्या जातील. युझर्ससाठी ही सेवा मोफत असेल. या माध्यमसमुहांना याचे शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक माध्यम समुहाला यासाठी ३० लाख डॉलर्स (२१.३ कोटी) देण्याचा विचार कंपनी करत आहे.

 

फेसबूकने पत्रकारांच्या सहाय्यासाठी आणखी काही घोषणाही केल्या आहेत. यात स्थानिक न्युझरुमद्वारे ३० कोटी डॉलर (२ हजार १२४ कोटी रुपये) इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. झुकरबर्ग यांनी आपल्या एका फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते की, 'जगभरात आम्ही आमच्या युझर्सना अधिकृत वृत्त, माहिती पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असू. जगभरातील पत्रकारांच्या मदतीने हे काम आम्ही शक्य करणार आहोत. फेसबूक माध्यम समुहांशी थेट संपर्कात असणार असून त्यामुळे एक अधिकृत मजकूर युझर्सना मिळू शकेल. फेसबूकवर कोणता मजकूर पब्लिश करायचा हे माध्यम समुह आणि फेसबूकचा अल्गोरीदम ठरवले. त्याद्वारे टॉप-10 बातम्या दिसतील. ब्रेकींग न्यूजसाठी वेगळी कॅटेगरी असणार आहे.




@@AUTHORINFO_V1@@