'येरे येरे पावसा' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

    18-Oct-2019
Total Views | 214



बालपणीपासून ते अगदी मोठे झाल्यावर सुद्धा पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाला पावसाच्या वेगवेगळ्या आठवणी असतात पण
'येरे येरे पावसा' हे गाणे प्रत्येकच जण लहानपणी गुणगुणत असतो. याच आल्हाददायी पावसावर आधारलेला एक चित्रपट आगामी वर्षात प्रदर्शित होणार आहे. 'येरे येरे पावसा' असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर प्रदर्शित झाले.

शफाक खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात पावसाची कोणती कथा उलगडेल याविषयी प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल. ही कथा स्वतः दिग्दर्शक शफाक खान यांनी तर त्यांच्याबरोबरच भूषण दळवी यांनी लिहिली आहे. चित्रपटातील संवाद अभिषेक संतोष आणि जया करगुटकर यांचे आहेत. सुशांत एन.किशोर पवार यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्यांनीच स्वीकारली आहे. विशेष म्हणजे 'मिशन मंगल' फेम चंदन अरोरा हे हिंदीतील अनुभवी संकलक या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत काम करत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121