चूलबुल पांडे इस बॅक असे म्हणत सलमान खानने 'दबंग ३' विषयीची मोठी घोषणा आज केली. काय आहे ती घोषणा हे जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतील. तर 'दबंग ३' च्या प्रमोशन ला आजपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा सलमान खानने नेहमीप्रमाणे त्याच्या हटके अंदाजात व्हिडीओ टाकून केली आहे. साधारण २० डिसेम्बरपर्यंत हे प्रमोशन चालेल असेही त्याने या व्हिडीओमध्ये नमूद केले.
२० डिसेम्बरला पुन्हा एकदा हे दबंग वादळ चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. तेव्हा सोनाक्षी सिन्हा, सलमान खान आणि प्रभू देवा यांच्या एकत्रित जलवा पाहायला प्रेक्षक नक्कीच तयार असतील. दबंग चित्रपटातील एक मुख्य भूमिका साकारणाऱ्या सलमान खानचा म्हणजेच चित्रपटातील रॉबिन हूड पांडे चा रुबाब या देखील व्हिडीओमधून झळकत आहे. तर आता या प्रमोशनमधील मजा बघायला तुम्ही तयार आहात का? आणि सलमान खानने आवाहन केल्याप्रमाणे 'दबंग ३' च्या टीम चे स्वागत करण्यास सर्वजण आतुरलेले असतीलच.
दबंग ३ मध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिंह यांच्याबरोबरच निखिल द्विवेदी आणि विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार किच्चा सुदीप हे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.
Hello! My name is Chulbul Pandey.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 1, 2019
Nice to meet you! #Dabangg3WithChulbulPandeyhttps://t.co/veZjWKAwyp @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmedia