कर्नाटकात कॉंग्रेस सरकारवर संक्रात

    15-Jan-2019
Total Views | 22


बंगळुरू : कर्नाटकात कॉंग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वेग आला आहे. अपक्ष आ. आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेत कॉंग्रेस सरकारला अडचणीत टाकले आहे.

 

सरकार हे कार्यक्षम असायला हवे, असे अपक्ष आमदार आर. शंकर यांनी म्हणत हा पाठींबा काढला आहे. एच. नागेश यांनीही पाठिंबा काढल्यानंतर म्हटले की, “काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नसल्याने काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

 
 
 

काँग्रेस-जेडीएसचे सरकार १७ जानेवारीपर्यंत पडेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपला काही आमदारांनी पाठींबा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने भाजपवर टीका केली जात आहे. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसला त्यांचे आमदार सांभाळता न आल्याने ही वेळ आली असल्याची प्रतिक्रीया भाजप नेते केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला आहे.

 

दरम्यान, कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण ११६ तर भाजपाचे १०४ आमदार आहेत. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना आता तो पाठिंबा काढून घेतला असून यालसह बहुजन समाज पार्टीचा एक आमदारही त्यांच्यासोबत आहे. काँग्रेस-जेडीएसचे संख्याबळ ११९ आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121