नाशिककरांची सायकलवारी उद्यापासून निघणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |



नाशिक : साहित्य, संस्कृती, आरोग्य, पर्यावरण आणि धार्मिक अधिष्ठान मूल्य समोर ठेऊन नाशिककरांची सायकल वारी १३ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या वारीत जवळपास पाचशे सायकलस्वार पंढरपुरकडे रवाना होणार असून नाशिक ते पंढरपूर या दिंडीच्या मार्गावर प्रत्येकी एक झाड लावणार असल्याची माहिती सायकलीस्ट असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी दिली.

 

सौर उर्जेवर चालणारा रथ हा या वारीचे विशेष आकर्षण असणार आहे. प्रवीण खाबिया यांच्या संकल्पनेतून हा रथ साकारला जात आहे. या रथामध्ये विठ्ठलाची दीड फुट आकाराची मूर्ती ठेवण्यात येणार असून दर वर्षी हा पायंडा पाडला जाणार आहे. त्याच बरोबर या वर्षी प्लास्टिक मुक्त वारी हि संकल्पना अमलात आणली जाणार असून एकही सायकलपटू या वारीमध्ये प्लास्टिकची वस्तू वापरणार नाही. वारीला निघतानाच त्यांना प्लास्टिक मुक्त शपथ दिली जाणार आहे.

 

दृष्टिहीन सायकलपटूहीपंढरपूर वारी करणार

 

नाशिकच्या सायकल वारीची क्रेज दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या वारीत यंदा एक दृष्ठीहीन युवक देखील सामील होणार आहे. मुंबई येथे राहणारा प्रसाद उतेकर हा सत्तावीस वर्षीय युवक गेली अनेक वर्षापासून सायकलचा चाहता आहे. त्याला या वारीविषयी कळल्यानंतर वारीसोबत जायची त्याची इच्छा होती. त्यामुळे मनीषा रौन्दळ यांनी त्याला नाशिक सायकल वारीचे आमंत्रण दिले. त्यामुळे प्रसादची इच्छा पूर्ण झाली असून या वारीच्या निमित्ताने तो नेत्रदानाचा संदेशही देणार आहे.

 

"मला सायकलची खूप आवड आहे. आपला फिटनेस राहावा आणि पर्यावरण, दृष्ठीदान करण्याचा संदेश या वारीतून मला द्यायचा आहे. मी दृष्ठीहीन असूनही मला सायकल वारीत सहभागी होण्याची संधी मिळाली असून बंद डोळ्यांनी मी हि वारी अनुभवणार आहे. यासाठी मला नाशिक सायकलीस्ट व मनीषा रौन्दळ यांनी सहकार्य केले".

- प्रसाद उतेकर

(दृष्ठीहीन सायकलीस्ट)
@@AUTHORINFO_V1@@