मराठवाडा विद्यापीठातील नव्या सदस्यांची होणार चौकशी

    13-Mar-2018
Total Views | 17



मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळामध्ये झालेल्या नव्या आणि अनियमित नियुक्त्यांची चौकशी करून दोषीवर कारवाई करू, असे आश्वसन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार सतीश चव्हाण यांनी या संबंधी राज्यपाल राव यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

मराठवाडा विद्यापीठामध्ये नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये घोळ असून चुकीच्या पद्धतीने या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून आणि मराठवाड्यातील काही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला होता. यानंतर मुंडे आणि सतीश चव्हाण यांनी काल राज्यपाल राव यांची भेट घेतली. हा सर्व प्रकार आणि या संबंधीचे काही पुरावे राव यांना दिले. यानंतर राव यांनी या सर्व गोष्टींची पाहणी करून या विषयी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन देखील राव यांनी दिले.
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121