म्हणून आवळ्याला 'त्रिदोषनाशक' म्हणतात!

    06-Dec-2018
Total Views | 79


 


आवळा हे एक औषधी फळ असून आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. आयुर्वेदामध्येदेखील आवळ्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. असं म्हटलं जातं की, हजार आजारावर आवळा हे एकच औषध अतिउत्तम आहे. म्हणूनच अशा या बहुगुणी आवळ्याचे नेमके फायदे काय आहेत? हे जाणून जाणून घेऊयात...

 

1) व्हिटॅमिन 'सी' साठी आवळा फायदेशीर आहे. आवळा या फळात जितके व्हिटॅमिन 'सी' आढळते तितके अन्य कोणत्याही फळात ते आढळत नाही.

 

2) लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.

 

3) आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशकही म्हटले जाते.

 

4) आवळ्याच्या सेवनाने चेहरा तेजस्वी होतो व म्हतारपणा दूर ढकलण्यात मदत होते. तसेच आवळ्याच्या सेवनाने पचनक्रिया नियंत्रित राहते.

 

5) आवळा हे फळ ज्वरनाशक आहे. तसेच याच्या सेवनाने आपली नजर तेज होते.

 

6) आवळा हे फळ हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकेच्या राजकारणात तिसऱ्या पक्षाची एन्ट्री! एलॉन मस्क यांच्याकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

अमेरिकेच्या राजकारणात तिसऱ्या पक्षाची एन्ट्री! एलॉन मस्क यांच्याकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

(Elon Musk announces forming of 'America Party') अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. त्यांच्यातील वादाचं मूळ कारण म्हणजे नुकतंच अमेरिकेत मंजूर झालेले 'वन बिग ब्युटीफूल बिल' हे विधेयक. या विधेयकाला मस्क यांनी विरोध केला होता. हे विधेयक अंमलात आल्यास थेट अमेरिकेच्या राजकारणात उतरण्याचे संकेत मस्क यांनी दिले होते. याच पार्श्वूभूमीवर मस्क यांनी मोठा निर्णय घेत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांच्या या नव्या पक्षाचे नाव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121