बोगीबील पूलाची ठळक वैशिष्ट्ये :
बोगीपूलाची रचना ही स्वीडन आणि डेन्मार्कमधील युरोपियन पुलांसारखी करण्यात आली आहे.
रस्ते आणि रेल्वे मार्ग असलेला हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पूल आहे.
या पूलाचे आयुष्य १२० वर्षे असणार आहे.
बोगीबील पूलाच्या लोअर डेकवर दोन लाईनचा रेल्वे ट्रॅक आहे. वरच्या डेकवर तीन मार्गी रस्ता आहे.
बोगीबील पुलामुळे दिल्ली ते दिब्रुगड या ट्रेन प्रवासाची वेळ तीन तासांनी कमी होणार आहे.
हा पूल ४.९ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी ५,९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
याआधी हा पूल ४.३१ किलोमीटर लांबीचा बांधण्यात येणार होता. त्यासाठी ३,२०० कोटी रुपयांचे बजेट होते.
२२ जानेवारी १९९७ रोजी देशाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याहस्ते बोगीबील पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
२१ एप्रिल २००२ रोजी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीच्या काळात बोगीबील पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली.
बोगीबील पुलाच्या तिन्ही मार्गांवर हवाई दलाची लढाऊ विमाने उतरु शकतात.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/