पाचोर्‍यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |
पाचोरा :
 
महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यावतीने 24 डिसेंबर हा जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
  
देशात 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने हा दिवस साजरा करण्यात येतो.
ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये , ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती मिळावी, ग्राहकांची जागृती निर्माण व्हावी, प्रबोधन व्हावे या दृष्टिकानातून हा कार्यक्रम येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर राहणार आहेत.
 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, अशासकीय सदस्य, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे विकास महाजन, विजय मोहरीर, अध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, क्षमा शर्मा, राजेंद्र शिंपी, ग्राहक पंचायतीचे सदस्य व दक्षता समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्राहकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार बी. ए.शिंदे यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@