सुरक्षित भविष्यासाठी डाक विभागाच्या योजना ‘संजीवनी’ - सेलुकर

    20-Dec-2018
Total Views | 31

सेवासुविधांच्या सल्ल्यासाठी पोस्ट फोरम समितीची स्थापना

 
भुसावळ : 
 
भारतीय डाक विभागातर्फे विविध बचत ठेव योजना तसेच विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या असून डाक विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून ऑनलाईन सेवेलासुद्धा प्रारंभ केला आहे.
 
 
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी डाक विभागाच्या योजना भविष्याच्या सुरक्षिततेसाठी संजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन भुसावळ विभागाचे अधीक्षक बी. बी. सेलुकर यांनी केले.
 
 
भुसावळ येथील मुख्य कार्यालयात आयोजित पोस्ट फोरमच्या बैठकीत ते बोलत होते. भुसावळ विभागात असलेल्या डाक कार्यालयांमध्ये उच्च प्रतीच्या चांगल्या व तत्पर सेवा देण्याच्या हेतूने पोस्ट फोरम समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
 
या समितीच्या बैठकीत बोलताना डाक अधीक्षक बी. बी. सेलुकर यांनी भारतीय डाक विभाग राबवत असलेल्या बचत ठेव, सुकन्या समृद्धी योजना, पुनरावृत्ती ठेव खाते, सावधी जमा खाते, मासिक आय योजना, लोक भविष्य खाते, ज्येष्ठ नागरिक बचत, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र अशा बचत व ठेव योजनांची सविस्तर माहिती देऊन विमा योजना, आधार नोंदणी व नूतनीकरण, ऑनलाईन सुविधा, ग्रामीण डाक जीवन बिमा, स्पीड पोस्ट या नावीन्यपूर्ण सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी आवाहन केले. लघुउद्योग, विद्यार्थी, शेतकरी, शहरी प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, ग्रामीण विद्यार्थी, ग्रामीण नागरिक अशांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत सुविधा पुरविल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पोस्ट फोरम ही समिती भुसावळ विभागातील विविध पोस्ट कार्यालयांमध्ये जाऊन तेथील सेवा सुविधांबाबत सल्ला देण्याचे काम करणार आहे.
 
 
या बैठकीला पोस्ट फोरम समितीचे अध्यक्ष डाक अधीक्षक बी. बी. सेलुकर, सदस्य डॉ. डी. पी. पाटील, ए. एस. वाणी, डॉ. अनंत चौधरी, डॉ. जगदीश पाटील, राजेश गोडबोले, मो. एजाज शेख इस्माईल यांच्यासह भुसावल डाक विभागातील अशोक चौधरी, निशांत शर्मा, आर. एन. सोमन, मनीष तायडे, गोपाल पाटील, ए. बी. शेख, एफ. के. सैयद आदी अधिकारी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121