LIVE - राजस्थान विधानसभा निवडणूक : २०१८

    11-Dec-2018
Total Views | 6
 
 

नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणूकीतील एकूण १९९ जागांसाठीचे निकाल स्पष्ट होत आहेत. ७ डिसेंबर रोजी या निवडणूकांसाठी मतदान झाले होते. दुपारी आलेल्या वृत्तानुसार, कॉंग्रेसला ९५ तर भाजपला ८० आणि इतर पक्षांना २४ जागांवर आघाडी मिळाली आहे.

 

सायंकाळपर्यंत निकाल स्पष्ट होतील. सुरुवातीला कॉंग्रेसने बहुमताचा आकडा पार करत १०१ जागांवर आघाडी मिळवली होती. मात्र, दुपारपर्यंत भाजपला ८० जागांवर आघाडी मिळाली होती. बसपला चार जागांवर तर अन्य पक्षांना २० जागांवर आघाडी मिळाली आहे.

 

राजस्थान निवडणूक निकालाच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचे एकूण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील एकूण ३५ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. एकूण ४ लाख ७४ हजार ४०२ मतदारांनी २ हजार २७४ मतदारांचे भविष्य कैद झाले होते. या निवडणूकीत ७२ टक्के लोकांनी मतदान केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121