जळगाव :
समांतर रस्ते कृती समितीच्या लाक्षणिक उपोषण स्थळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन, (एन.मुक्टो) बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शाखा जळगाव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचार्यांची सहकारी पतपेढी, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ या संघटनांनी शुक्रवारी सहभाग नोंदवत पाठींबा दिला.
लाक्षणिक उपोषणाला कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र.कुलगुरू बी.पी.माहुलीकर, कुलसचिव व्ही. बी. पाटील, कार्यकारी अधिकारी विलास पाटील, जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांच्यासह या महामार्गावर बळी गेलेले गणेश लोखंडे यांच्या पत्नी सोनाली लोखंडे व अरुणा सैंदाणे यांची उपस्थिती होती.
संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे, लेखा अधिकारी खरात, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे, नगरसेविका रेणुका काळे, लाइफ सायन्स संचालक माहेश्वरी, कुलसचिव दिलीप पाटील, विद्यापीठ क्रीडा संचालक दिनेश पाटील, फार्मसी कॉलेजचे डॉ.वडनेरे, नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य एल.पी.देशमुख, पंकज कॉलेजचे प्राचार्य व माजी कुलसचिव संभाजी देसाई, मुनाफ शेख, शेंदुर्णी कॉलेजचे आर.डी.गव्हाळे, साळुंखे त्याचप्रमाणे जिल्हा माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
जैन इरिगेशन संचालित जैन व्हॅली व जैन इरिगेशन या औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या सुमारे 4000 सहकार्यांनी अध्यक्ष अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी करून आपले पाठींब्याचे पत्र जैन इरिगेशनचे वरिष्ठ मानव संसाधन व्यवस्थापक पी.एस.नाईक, सी.एस.नाईक तसेच वरिष्ठ व्यवस्थापक अनिल जोशी यांच्या हस्ते कृती समितीला दिले.
जळगाव जिल्हा माहेश्वरी संघटना त्याप्रमाणे श्री अष्टांगयोग बहुउद्देशीय संस्था व थोरवी महिला मंडळानेसुद्धा आपला पाठींबा दिला आहे. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.