डांभुर्णीजवळ अपघातात दोन युवक ठार

    17-Nov-2018
Total Views | 9

महामार्गावरील वळणामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ


डांभुर्णी ता.यावल 
डांभुर्णी-जळगाव महामार्गावर गावापासून दीड किमी अंतरावर असलेले शालिग्राम रेवा चौधरी यांच्या शेताजवळील वळणावर शुक्रवारी दुपारी यावल तालुक्यातील सौखेडा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका गर्भवती महिलेला घेऊन जळगावकडे जात असताना समोरून डांभुर्णीकडे येत असलेले मोटारसायकल दुचाकी वाहन (हीरो होंडा क्र. एमएच.19, 2293) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेमध्ये समाधान कोळी आणि अंकुश काळी (रा.चांदसर ता.धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील वळणामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती.
 
या अपघातानंतर मोटारसायकल दहा ते पंधरा फूट घसरत गेली होती. मोटारसायकल चालक समाधान भावलाल कोळी (वय 25) आणि अंकुश श्यामलाल कोळी (वय 24) दोघे रा.चांदसर ता.धरणगाव येथील असून या दोन्ही युवक जागीच ठार झाले.
 
घडलेल्या घटनेमुळे रुग्णवाहिका चालक शरद जावळे यांनी आपल्या वाहनातील गर्भवती महिलेला खासगी वाहनातून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले.
 
या अपघाताची माहिती परिसरात पसरताच कोळन्हावी येथील सरपंचपती व शिवसेना युवाध्यक्ष गोटू साळुंके, पो.पा.कैलास साळुंके यांनी घटनास्थळी धावून घटनेची माहिती यावल पोलिसात कळवली.
 
पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक दीपक ढोमणे, हे.कॉ.राजेश वाडे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तातडीने त्यांनी मृत युवकांना खासगी वाहनातून जळगावला हलविले.
 
 
या महामार्गावरील असलेल्या वळणावर असे बरेच अपघात घडत असून अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत असल्याची चर्चाही घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये होती.
 
याप्रसंगी डांभुर्णी पो.पा.हेमराज सावळे, पो.पा.किरण कचरे, अनिल साळुंके आदींनी मदत केली. सार्व. बांधकाम विभागाने या वळणावरील झुडुपे काढावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121