भुसावळ :
नरेंद्र मोदी विचारमंच तालुकाध्यक्ष नारायण कोळी, राहुल महाजन मित्र परिवार यांनी आज साकरी येथे सकाळी 10 ते 12 वा. जि. प. शाळेमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यात गावातील बर्याच मुली-महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.
सांघिक प्रथम बक्षीस 3001 व एकल प्रथम बक्षीस रु.2501, द्वितीय बक्षीस 1001 तृतीय बक्षीस 501 याप्रकारे देण्यात आली. उर्वरित सर्वांना सहभागाबद्दल रजनीताई सावकारे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
तसेच कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे, सखी श्रावणी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेश्रीताई नेवे, नारिशक्ती फाउंडेशन अध्यक्षा नेहा गाजरे, साकरी ग्रामपंचायत सदस्या निर्मला कोळी, प्रतिभा जावळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, नेव्ही कॅप्टन संदीप रायभोळे, सामाजिक कार्यकर्ते भूषण झोपे उपस्थित होते. यावेळी विजयी स्पर्धकांच्या चेहर्यावर एकच उत्साह दिसून येत होता.