‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातील सर्वात उंच पुतळा

    31-Oct-2018
Total Views | 80



गांधीनगर : लोहपुरुषम्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीपुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला हा पुतळा १८२ मीटर उंच असून हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे.

 

जगातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या चीनमधील बौद्ध प्रतिमेपेक्षा हा पुतळा उंच आहे. या पुतळ्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१३ साली या पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली. अखेर पाच वर्षांच्या दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर अखेर या पुतळ्याचे लोर्कापण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर हेलिकॉप्टरने सरदार पटेलांच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

 

'स्टॅच्यू ऑफ युनिटीची वैशिष्ट्ये

 

* सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची १८२ मीटर आहे. हा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.

 

* सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

 

* हा भव्य पुतळा उभारण्यासाठी तीन हजार ५०० कामगार व २५० अभियंत्यांची फौज कार्यरत होती.

 

* २०१३ ला पुतळ्याची पायाभरणी केल्यानंतर याचे काम लॉर्सन अॅण्ड ट्रूब्रोया कंपनीकडे देण्यात आले होते. लॉर्सन अॅण्ड ट्रूब्रोआणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.

 

* पर्यटकांना सरदार सरोवर धरण आणि आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी 500 फूट उंचीवर गॅलरी उभारण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121