जनाधार वाढविण्यासाठी संघटन मजबूत करा भुसावळात आ. एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

    27-Oct-2018
Total Views | 22
 

 
 
 

जनाधार वाढविण्यासाठी संघटन मजबूत करा
 
भुसावळात आ. एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
 

भुसावळ, २६ ऑक्टोबर
कॉग्रेसच्या सरकारच्या काळात जी धोरणे अवलंबण्यात आली. त्याची फळे आपण भोगत असून त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारासह जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण होते. त्यामुळे देश विकासात मागे पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या ध्येय धोरणावर जनतेने विश्वास ठेवला. तब्बल २८३ खासदार निवडून आले. आगामी काळातही भाजपाचाच विजय होणार असून कार्यकत्र्यांनी जनाधार वाढवण्यासाठी संघटन मजबूत करावे असे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे म्हणाले. येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात २६ रोजी भाजपा बुथ प्रमुख व शक्तीवेंैद्र प्रमुख यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, न. पा. गटनेते हाजी मुन्ना इब्राहीम तेली, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पं. स. सभापती प्रिती पाटील, अलका शेळके, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, रमा शंकर दुबे, पवन बुंदेले, महिला शहराध्यक्षा मिना लोणारी उपस्थित होते.
 
 
ते पुढे म्हणाले की, आगामी निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी शासनाची कामे नागरीकांपर्यंत पोहचवा. मतदारांची मानसिकता तयार करा सोशल मिडीयाचा आपल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी वापर करावा. २०१४ पेक्षाही यंदाची स्थिती चांगली आहे. असे आ. खडसे यांनी यावेळी म्हणाले.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी जनसंघ ते भाजपा यावर आपले विचार मांडले.
जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक पूर्व व्यवस्थापन कसे असावे यावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्राचे भाषण आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. सुनिल नेवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी तर आभार अलका शेळके यांनी मानले.
 
मंत्री का झालो नाही, हे विचारू नका !
कार्यशाळेत भाषणानंतर आ.एकनाथराव खडसे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना म्हणाले की, काही समस्या असल्यास त्या विचाराव्यात मात्र नाथाभाऊ मंत्री का झाले नाही? हे मात्र विचारु नये अशी कोपरखळी त्यांनी कार्यक्रमादरम्यान मारली. त्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.
यांची होती उपस्थिती
कार्यशाळेत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांच्यासह न. पा. शिक्षण सभापती ऍड. बोधराज चौधरी, पाणी पुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, दिपक धांडे, प्रा. दिनेश राठी, राजु खरारे उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121