शेंदुर्णीत भाजपातर्फे स्वच्छता अभियान

    27-Oct-2018
Total Views | 30
 
 
शेंदुर्णीत भाजपातर्फे स्वच्छता अभियान
 
शेंदुर्णी, २६ ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टी शेदुर्णीतर्फे गावातील नालेसफाई गटारी फवारणी मशिन जेसीबीच्या साह्याने सफाई करून स्वच्छा अभियानाचा शुभारंभ गुरूवारी सकाळी १० वा. भाजपा जेष्ठ नेते रघूनाथ वामन गुजर यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले.
 
याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते उत्तमराव थोरात, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, प्रकाश झवर, अमृत खलसे, नारायणराव गुजर, कडोबा सुयवंशी, नामदेवराव बारी, सुनिल शिनकर, किरण बारी, देवचंद बारी, गणेश पाटील, योगेश अस्वार, संदीप ललवाणी, कय्युमखान शकिल पिंजारी, रंजन निकम, अशपाक बागवान, शरद बारी, भास्कर गुजर, भैय्या इटावाले, अलिम तडवी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सध्या गावात बर्‍याच दिवसापासून नालेसफाई झाली नव्हती. त्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाल्याने खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यासाठी गावात स्वच्छता मोहिम राबविण्याचा संकल्प शेदुर्णीत भाजपाने हाती घेतला. सध्या नगरपंचायतीवर प्रशासक असतानासुध्दा स्वच्छता अभियान राबवून कर्तंव्याची जाणीव ठेवून शेदुर्णीतील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी साफसफाई करण्यासाठी लागणारे जेसीबी, टॅक्ट्रर , फवारणी मशिन मागणीसाठी जामनेर नगरपालिका नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते.
या निवेदनाची नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी दखल घेऊन वरील साहित्य त्वरीत पाठविले. त्यामाध्यमाने शेदुर्णी गावात साफसफाई करून स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे.
 
 
जामनेरच्या नगराध्यक्षा यांचे सहकार्य
नागरीकाचे आरोग्य चांगले राहावे. शेदुर्णी गावातील नालेसफाई होऊन साफसफाई व्हावी, यासाठी लागणारे साहित्य त्वरीत जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी उपलब्ध करून दिले. तसेच शेदुर्णी नगरपंचायतीचे प्रशासक टिळेकर, मुख्याधिकारी राहूल पाटील यांचे याकामी सहकार्य लाभल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी सागितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121