भारतीय निर्यातीत सकारात्मक वाढ: सुरेश प्रभू

    26-Oct-2018
Total Views | 6




नवी दिल्ली: वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत ९.८ टक्के वाढ झाली असून गेल्या सहा वर्षातला हा सर्वात जास्त वृद्धी दर आहे. जागतिक आघाडीवर अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत. तरीही भारतीय निर्यातीत ही सकारात्मक वाढ दिसून आल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ते भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'निर्यात परिषद २०१८' मध्ये बोलत होते. भारताच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी यासाठीचे धोरण तयार करण्यासाठी आपले मंत्रालय काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

विभागवार, वस्तूवार आणि प्रांतवार निर्यात धोरण आखण्यासाठी संबंधित मंत्रालयांशी चर्चा सुरु असल्याचे प्रभू यांनी सांगितले. निर्यात प्रोत्साहन परिषद, निर्यातदार आणि संबंधितांशी नियमित बैठका होत असून यासंदर्भातल्या प्रगतीचा आपण व्यक्तीश: आढावा घेत आहोत असे त्यांनी सांगितले. निर्यातीवर परिणाम करणाऱ्या काही मुद्यांसंदर्भात महसूल आणि पर्यावरण विभागासमोर मांडण्यात आले आहेत. कृषी निर्यात धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असून त्यामुळे कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास वाणिज्य मंत्र्यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121