सीबीआयच्या मुख्यालयावरच छापे!

    24-Oct-2018
Total Views | 6

 


 
 
 
नवी दिल्ली : सीबीआय भ्रष्टाचारप्रकरणी आज पहाटे दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयावरच छापे मारण्यात आले. आजवरच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे. पहाटेपासूनच सीबीआयच्या मुख्यालयाची झाडाझडती घेतली जात होती. कागदपत्रांची तपासणी केली जात होती. या मुख्यालयातील १० वा आणि ११ वा मजला सील करण्यात आला आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर ३ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डीसीपी देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनीदेखील राकेश अस्थाना यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला होता. तर राकेश अस्थाना यांनीही वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
 
 
याप्रकरणी अस्थाना आणि वर्मा या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. सध्या सीबीआयचे संयुक्त संचालक नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआयच्या संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्यालयातील १० वा आणि ११ वा मजला सील करण्यात आल्यामुळे तेथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या दोन्ही मजल्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे नष्ट केले जाऊ नयेत. म्हणून हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची टीमही बदलण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121