ट्विटरच्या पोस्टवरून लालूंचा शालजोडीतला टोला
सध्या सोशल मीडियावरून वादविवाद, विनोद किंवा इतर गोष्टींचे शेअरींग अधिक वाढले आहे. परंतु सोशल मीडियावरून एकदा पोस्ट झालेली गोष्ट आपण कितीही केलं तरी पुन्हा मिटवता येणं शक्य नाही, हे देखील अजून काही मान्यवरांना कळलेलं दिसत नाहीये.
त्याच झालं असं की, लालूप्रसाद यादव यांनी दोन दिवसांपूर्वी बिहारच्या विकासासंदर्भात एक पोस्ट त्यांच्या ऑफिशिअर ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली होती. त्यामध्ये असं लिहीलं होत की, “तथाकथीक विकसित राज्यांना मागे टाकून बिहार १५.०६ विकासदरासह देशातील अव्वल स्थानी जाऊन पोहचला आहे. आता कुठे आहेत मंगलराज वाले...?’’ या वक्तव्यामधील तथ्य शोधण्याचा विषय काही काळ बाजूला ठेवू, परंतु लालूंच्या या पोस्टला केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून ‘लाईक’ केले होते.
आता गंमत अशी झालीये की, उशीरा का होईना पण आपण सध्या केंद्रात मंत्री आहोत आणि विरोधकांच्या अशा पोस्टला आपण लाईक करणे शोभून दिसणार नाही किंवा ते मोदी आणि भाजपाला मान्यही होणार नाही असे लक्षात आल्यावर पासवान साहेबांनी काही तासांपूर्वी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटरवरून म्हणले आहे की, “लालूंचे ट्विटरवरील असे कोणतेही वक्तव्य वाचले नसून मी त्याला ‘लाईक’ही केलेले नाही. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत.’’
पासवानांच्या या ट्विटरला उत्तर देताना लालूंनी ‘टेक्नॉलॉजी’चा आधार घेत पुराव्यासहीत एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे आणि त्याची लिंक ट्विटर अकाऊंटवर टाकली आहे. त्या पत्रात लालूंनी पासवानांना शालजोडीतून टोले मारल्याचे सरळ स्पष्ट होत आहे.
प्रिय रामवीलासजी, “आप और हम बीते जमाने के लोग है, टेक्नॉलॉजी नाम की चिडिया को अपने दिमाग के पिंजडे मे चाहे जितना भी बंद करना चाहें, पर ये कुछ उडानें हमारे काबू से बाहर भर ही लेंगी. पब्लिक सब जानती है और अब अच्छे से जान जायेगी. वैसे स्क्रिनशॉट के हाथी चिंघाड चिंघाड कर सोशल मीडिया के जंगल में शोर मचा ही देंगे कि ट्विटरपर आपके पद चिन्ह कहाँ कहाँ पडे...’’
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे-देवेंद्र फडणवीस यांचा वाद आणि आता लालू-पासवान यांच्यातील हा गंमतीदार किस्सा पाहून सोशल मीडियावर ‘अॅक्टिव्ह’ राहणार्या शहण्यांनी त्यापासून काहीतरी बोघ घ्यावा.