विद्यार्थिनी असो, नोकरदार महिला अथवा गृहिणी, त्यांच्या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, वाढत्या ताणतणावामुळे आणि आहार-विहाराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. तेव्हा, या समस्यांचे स्वरुप, लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरत जगभरातील अनेक देशांवर ब्रिटनने राज्य केले. धर्मनिरपेक्षतेसारख्या गोंडस विचारांना जन्म देणारा ब्रिटनच. मात्र, या शब्दाची किंमत ब्रिटनला आता हिंसाचाराच्या घटनांच्या स्वरूपात मोजावी लागत आहे. ब्रिटन मागील काही वर्षांपासून धार्मिक हिंसाचाराच्या गर्तेत आहे. ब्रिटनमधील शरणार्थी मुस्लिमांमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, वारंवार उफाळून येणार्या दंगलींमुळे ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ब्रिटनच्या लीड्स शहरात दि. १८ जुलै रोजी दोन हजारांहून अधिक दंगेखोरांनी सरकारी बसेसची
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
श्रीलंकेच्या कृषिमंत्र्यांनी शुक्रवारी नागरिकांना त्यांच्या घरातील बागांमध्ये अन्नधान्य पिकवण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर इमरान खान आणि त्यांचे समर्थक रस्त्यांवर उतरले असून, सरकारच्या भाववाढीविरुद्ध हिंसक आंदोलनं करत आहेत.
जगात जेव्हा म्हणून कधी युद्धजन्य परिस्थिती उद्भवते तेव्हा आर्थिक आणि अन्नधान्यविषयक समस्या डोके वर काढत असतात. आज जग रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या गडद छायेतून मार्गस्थ होत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांच्या सहभागामुळे राज्यभरात गाजलेल्या गोरेगांवच्या सिद्धार्थ नगर येथील पत्राचाळीतील रहिवाशांच्या समस्या काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे.
मुंबईच्या ‘चिता कॅम्प’ परिसरातील नागरिकांना मागील २० ते २५ वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील अस्वच्छतेसोबतच इतर मुद्द्यांमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मात्र, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ‘चिता कॅम्प’ परिसरातील एकमेव अशा शहाजी नगर प्रसूतिगृहाची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. ‘चिता कॅम्प’ भागातील नागरिकांनी आणि महिलांनी प्रभागातील प्रसूतिगृहाच्या समस्येवर नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.
डोंबिवलीतील 27 गावांतील भोपरगाव गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत. याठिकाणाच्या अमृतयोजना रखडल्याने आणि एमआयडीसीमधील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यावर प्रेशर वाढविले की पाईपलाईन फुटते त्यामुळे नागरिकांना पाणी येत नाही. दिवाळीला नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता त्यांना टॅकरने स्वखर्चाने पाणी देणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
अफगाणिस्तानच्या समस्येचा सामना करण्यास भारत सज्ज - बिपिन रावत
मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे दोनशे एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 'वर्षा' निवासस्थानी दोनशे एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत याबद्दल बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,
माध्यमिक शिक्षकांच्या अनेक समस्या व मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेच्या वतीने माध्यमिक विभागाचे उपसंचालक (नाशिक विभाग) यांना निवेदन दिले.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध कार्यालयांमधील कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे संपूर्ण विभागात, 20 ते 22 नोव्हेंबर या काळात समस्या निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विभागातील कर्मचार्यांनी समस्यांबाबत चार हजार अर्ज सादर केले.
काही शतकांपूर्वी ज्या आरोग्याच्या समस्या माणसाला भेडसावत होत्या, त्या समस्यांचे आज काय झाले? याचा मागोवा घेतला तर जाणवते की, कधीकाळी जागतिक स्तरावर जे रोग माणसाचा जीव घेतल्याशिवाय राहात नसत, ते रोग आज हद्दपार झाले आहेत. देवी, पोलिओ वगैरेंचा नायनाट झाला आहे. आरोग्यविषयक अज्ञान, निसर्गाविषयीचे भीतीयुक्त अज्ञान आणि दैनंदिन जगण्यासाठीचा संघर्ष यामुळे माणूस या ना त्या कारणाने प्रत्येक शतकात कोणत्या ना कोणत्या विशिष्ट आजाराचा बळी ठरला आहे.
अमेरिका म्हणजे स्वच्छ आरसा, अशी धारणा जे नागरिक बाळगतात, त्यांनी त्याची दुसरी बाजू समजून घेऊन स्वदेशाभिमान जोपासण्याची आवश्यकता आहे.
काही लोक तापदायक परिस्थितीने खच्चून जातात, तर काहीजण आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, असा ग्रह करून घेतात. याच्या अगदी उलट यशस्वी माणसे अवघड अनुभवांतून संधी शोधू लागतात. त्यांना कठीण परिस्थिती ही कोडं आहे व ते सोडवायचे आहे असे वाटते.
आपल्या मुलांच्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, शास्त्रीय चाचण्यांच्या आधारे त्याचे निदान करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे, अतिचंचलतेच्या लक्षणांमध्ये वयाबरोबर सुधारणा होत जाते.
नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींना परदेशात पाठवून तिथे त्यांना गंडवणे, हादेखील मानवी तस्करीचाच एक प्रकार आहे.
रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरटे, भामट्यांच्या वाढत्या दहशतीने डोकेवर काढल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
शहरातील मेहरूण तलावाचे सुशोभिकरण करून त्याला जिल्ह्यातील एक मोठे पर्यटनस्थळ करण्याचा महापालिका प्रशासनाचा मनोदय होता.