कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणव
Read More
कर्नाक उड्डाणपूल सिंदूर उड्डाणपूल म्हणून ओळखला जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरूवार, दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. हा पूल आता सिंदूर उड्डाणपूल म्हणून ओळखला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्
ज्यातील वनक्षेत्र आणि व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या आठ रेल्वे मार्गिकांवर वन्यजीवांच्या सुककर हालचालीच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची शिफारस 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) केली आहे (vidarbha railway network).
हैदराबाद येथील रेल्वे ट्रॅकवर महिलांचा कार चालवण्याचा व्हिडिओ 'एक्स कॉर्प इंडिया' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने रेल्वे मंत्रालयाने 'एक्स कॉर्प’ कंपनीला नोटीस बजावली होती. या कंपनीने मंगळवार दि. १ जुलै रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात नोटीसीविषयी हरकत याचिका दाखल केली.
डिसेंबर २०२५ पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या ४०व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार,दि.१ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 'रेलवन' या नवीन ॲपचा
दिवा मार्गावरील अपघाताने उपनगरी रेल्वेच्या जुन्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार कै. रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून ते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नांपर्यंत उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक तत्त्वज्ञ आणि संवेदनशील नेत्यांनी आवाज उठवला होता. पण रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.
९००० हॉर्सपॉवर क्षमतेच्या इलेक्ट्रिक इंजिनांच्या दाहोद उत्पादन प्रकल्पावर काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषदेत केलेले आरोप रेल्वे मंत्रालयाने सोमवारी फेटाळून लावले आहेत. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा संपूर्ण प्रकल्प पारदर्शकतेच्या आधारे राबवण्यात आला असून, तो भारताच्या प्रगत तांत्रिक क्षमतांचे व ‘मेक इन इंडिया’ धोरणाचे उदाहरण आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरुन दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी आहे. यापैकी मेहताब हा मुंब्रा शीळ परिसरात राहतो. तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४ लाख १७ हजार ३६० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कुर्ला - वांद्रे रेल्वे मार्गाचे मूळ रेखन रद्द करून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली रेल्वे स्थानकांची जागा बदलण्याचा एमएमआरडीएचा डाव उघड करत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला.
विठूराच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांची पाऊले आता पंढरपूरच्या दिशेने वळली आहेत. अशावेळी आषाढी वारीनिमित्त राज्यभरातील वारकऱ्यांसाठी विशेष ८० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारणाऱ्या माधवी लता आहेत कोण?
(PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिर
(Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
New railway line connecting religious places in Ahilyanagar Rahuri to Shanishinganapur रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
(New railway bridge in Kurla) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या१७.५० किमी लांबीच्या प्रकल्पाचा अविभाज्य घटक असलेल्या कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान लक्षणीय प्रगती झाली आहे. कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाच्या (१०.१ किमी) संदर्भात, नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांचे उद्दिष्ट आहे.
(MP Naresh Mhaske instructions to thane railway officials) ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे. नियमित स्वच्छतेवर भर द्या, युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
( Pahalgam terrorist attack Former MLA Narendra Pawar demand to Union Railway Minister Ashwini Vaishnav ) कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
new Pamban railway bridge राष्ट्रसेवेचा प्रण घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खर्या अर्थाने नव्या भारताची पायाभरणी होत आहे. देश पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीत वेगवान प्रगती करत असून, भारतीय रेल्वेचादेखील यामध्ये मोलाचा वाटा. याचेच उदाहरण सांगायचे झाले तर, आज श्रीरामनवमीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेला तामिळनाडूतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा पंबन रेल्वे पूल...
( Who installed 103 out of 306 hoardings on railway land ) मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) घेतलेल्या चौकशीतून समोर आली आह
( block on Central Railway to remove girder ) कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवार, दि. २९ व रविवार, दि. ३० रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
( Opposition silenced over Railway Minister's parliament speech ) देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी लोकसभेत आपल्या भाषणाने विरोधकांची बोलतीच बंद केली. त्यांनी विरोधी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी दिल्याने गोंधळ घालणारे विरोधक चांगलेच हवालदिल झाले होते.
( on work of the new Thane railway station MP Mhaske draws the attention of the Railway Minister ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल स
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी
ब्रिटिशकालीन जागतिक वारसा इमारती मुंबईची शान वाढवत असताना, आज मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, वांद्रे-वरळी सी लिंक यांसारखे भव्य अभियांत्रिकी अविष्कारही जागतिक स्तरावर आपली मान उंचावत आहेत. अशावेळी मुंबईतील १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जीर्णावस्थेत असलेल्या मुंबईतील अनेक रेल्वे आणि रस्ते उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या सौंदर्यात भर घालणार्या प्रस्तावित चार रस्ते उड्डाणपुलांचा आढावा घेणारा लेख.
मुंबईस्थित चाकरमानी होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत असतात. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
जपानी भाषेत बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार्या जपानी शिंकानसेनने, आपल्या अनोख्या हायस्पीड तंत्रज्ञानाने जगभरातील २४हून अधिक देशांतील वाहतूक व्यवस्था कायमची बदलून टाकली. जपानचा हाय-स्पीड रेल्वे प्रवास १९६४ साली, टोकियो ऑलिम्पिकच्या अगदी आधी, टोकाइदो शिंकानसेनच्या उद्घाटनाने सुरू झाला. या मार्गाने जपानची राजधानी टोकियो ओसाकाशी जोडली गेली. ३२० मैलांचा प्रवास अडीच तासांवर आला. यातूनच रेल्वे प्रवासात क्रांती घडली.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल आता सुपरफास्ट आणि आलिशान होणार असून या सेवेत लवकरच नवे आणि प्रवाशांच्या पसंतीला येतील असे बदल करण्याची भूमिका भारतीय रेल्वेने घेतली आहे. त्यातूनच खचाखच भरलेल्या डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेसे ऑक्सिजन मिळू शकेल अशा पद्धतीची रचना असणारे नवे डबे यासेवेत आणले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास मोकळा होऊ शकेल. या बदलासोबतच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर नवे टर्मिनल उभारण्यासह उपनगरीय रेल्वे सेवेत नवे बदल होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वै
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
भारतीय रेल्वेने शनिवारी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकापासून श्रीनगर रेल्वे स्थानकापर्यंत पहिल्या वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही ट्रेन भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेल्या अंजी खाड पुलावरून आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलावरून धावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षांत देशात अनेक महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्णत्वास आले, तर हजारो प्रकल्पांची कामे निर्माणाधीन आहेत. त्यापैकीच एक म्हणजे समर्पित रेल्वे कॉरिडोर. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीला ( Rail Freight Transport ) गती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील ‘न्यू साऊथ वेल्स विद्यापीठा’ने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडोर देशाच्या जीडीपीमध्ये १६ हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
train accident जळगावातील परांडा रेल्वेस्थानकावर रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली होती. या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक रेल्वेने पुष्पक रेल्वेला धडक दिली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. ही घटना दि : २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा झाला आहे (wildlife railway kill). कारण, गेल्या वर्षभरात १४ वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे (wildlife railway kill). यामध्ये तीन वाघांचा समावेश असून रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांचा देखील समावेश आहे (wildlife railway kill). एकीकडे याच मार्गिकेवर मध्यप्रदेशमध्ये बांधण्यात आलेल्या अंडरपासमुळे वन्यजीवांचा हालचाली सुकर झाल्या असताना महाराष्ट्रातील मार्गिकेवर वन्यजीवांसाठी एकही अंडरपास बांधण्यात आलेला नाही. (wil
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे ( Railway Role for Development ) विभागाचे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे नमो भारत रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टम (RRTS)च्या दिल्ली विभागाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी साहिबाबाद आरआरटीएस स्थानकाला भेट दिली आणि दिल्लीतील न्यू अशोक नगर स्थानकापर्यंत या नमो भारत ट्रेनने प्रवास केला. या प्रवासादरम्यान मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
(Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
मध्य रेल्वेकडून खोट्या भरतीचा पर्दाफाश
भारतीय रेल्वेने धुक्याच्या परिस्थितीत गाड्यांना अधिक सुरळीतपणे धावण्यास मदत करण्यासाठी १९,७४२फॉग पास उपकरणे स्थापित केली आहेत. यामुळे एकूण प्रवासी सुरक्षितता वाढेल, विलंब कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक विश्वासार्ह बनतील. सोशल मीडिया साइट एक्सवरून रेल्वे मंत्रालयाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की,“भारतीय रेल्वे देशभरात धुके सुरक्षा उपकरणांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक पटींनी वाढ करून सतत सुरक्षा उपायांची हमी देते”.
दादरमधील ( Dadar ) हनुमान मंदिर निष्कासित करण्यासंदर्भातील नोटिशीला रेल्वे मंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. तमाम हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या भावना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवला. या भावनांचा आदर करीत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित नोटिशीला स्थगिती दिली.
ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे ( Railway ) स्थानकाच्या कामात रेल्वेच्या उच्च दाब वीज वाहिनीचा अडथळा होत आहे. तेव्हा, स्थानकाचे काम थांबु नये यासाठी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
भारतातील पहिला ४१० मीटरचा हायपरलूप चाचणी ट्रॅक बांधून पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प भारताच्या अति-आधुनिक वाहतूक प्रणालींमध्ये एक मैलाचा दगड ठरेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या समाजमाध्यमातून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची घोषणा केली. यासोबत त्यांनी या चाचणी ट्रॅकचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यावेळी वैष्णव यांनी म्हंटले आहे की, “भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक (४१० मीटर) पूर्ण झाला. टीम रेल्वे, आयआयटी मद्रासची आविष्कार हायपरलूप टीम आणि TuTr यांचा हा एक इनक्युबेटेड स्टार्टअप आहे.”
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा (MUTP-III)भाग असलेला बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम लक्ष्यित पूर्णत्वाच्या अगदी जवळ येऊन लक्षणीय प्रगती करत आहे. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे उभारण्यात येत आहे. पनवेल आणि कर्जतला आधुनिक दुहेरी मार्गाने जोडणारा हा मार्ग या दोन्ही भागांना कनेक्टिव्हिटी देण्यास सज्ज होता असल्याची माहिती एमएसआरव्हीसीने दिली आहे. या प्रकल्पाने भौतिक आणि आर्थिक अंमलबजावणीच्या दृष्टीने लक्षणीय प्रगती साधली आहे. ऑक्टोबर २०२४पर्यंत या प्रकल्पाची ६७ टक्के प्रगती
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या झंझावातापुढे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आहे. मनसेच्या पक्ष मान्यतेबरोबरच कायमस्वरुपी मिळालेले रेल्वे इंजिनही यार्डात जमा करण्याची वेळ राज ठाकरेंवर येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते जानेवारी २०२५मध्ये 'नवी दिल्ली ते काश्मीर'ला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी जाहीर नुकतीच जाहीर केली. इतकेच नाही तर ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंकवर धावेल. यावेळी ही ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या प्रतिष्ठित चिनाब रेल्वे पुलावरूनही धावणार आहे.
(Marathi Language)एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्याच मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची वारंवार गळचेपी होताना दिसते. ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, वाढली त्याच ठिकाणी मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली.
अंबरनाथ येथे असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या रेल नीर प्लांटमध्ये लवकरच नवीन पाण्याची लाइन जोडली जात आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल. उन्हाळ्यात मुंबईतील बहुतांश लोकल रेल्वे स्थानकांवर पाण्याची मागणी वाढते आहे. अनेक वेळा ही मागणी आयरसीटीसीकडून पूर्ण होत नाही. प्लांट सध्या दररोज २ लाख एक लिटर रेल नीरच्या बाटल्या तयार करतो, ज्या १४,००० बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लाईन जोडल्यानंतर ही क्षमता दररोज २०,००० बॉक्सपर्यंत वाढेल.
मुंबई, पुणे, नागपूर इ. येथून देशभरातील विविध स्थळांसाठी विशेष गाड्या