गेल्या ३० वर्षांपासून सेवेत असणारी गोदावरी एक्सप्रेस दि. १३ नोव्हें. पासुन बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनमाड ते मुंबई असा या एक्सप्रेसचा प्रवास होता. या गाडीच्या जागी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते धुळे ही नवीन ट्रेन सुरु केली आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि या भागातील सर्वसामान्य प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथून सोडण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेने के
Read More
बिहारमधुन महाराष्ट्रात तस्करीसाठी आणलेल्या सुमारे ५९ मुलांची रेल्वेपोलिसांनी सुटका केली आहे. जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. दानापूर- पुणे एक्सप्रेसमध्ये ही मुले आढळुन आली. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थाचा दि. 3 जुलै रोजी शताब्दी सोहळा साजरा करत आहे. 100 वर्षांपूर्वी मनमाडसारख्या कामगार वस्तीच्या गावात शाळा सुरू करणे, हे एक आव्हानच होते आणि विपरित परिस्थितीतदेखील हे आव्हान रावसाहेब यांनी लीलया पेलले व शाळेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा करंदीकरांसारखे सारस्वत विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. ज्ञानदानाची सदावर्ते घालणार्या या संस्थेने पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम नि:स्वार्थपणे केले आहे, त्याविषयी...
मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांशा व्यवहारेनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. आकांक्षाने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मनमाड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. याप्रसंगी त्यांचे भाषण सुरु असतानाच दोन वेळेस कार्यक्रमाची वीज खंडित झाली
मनमाडच्या रेल्वे वर्कशॉपने कोकण रेल्वे, जम्मू काश्मीर रेल्वे यासह अतिदुर्गम भागांसाठीच्या रेल्वे पुलांचे सुटे भाग तयार केले आहेत. या क्षेत्रातील वर्कशॉपचा ११५ पेक्षाही अधिक वर्षांचा अनुभव आहे. वर्कशॉपची पुन्हा नवी ओळख निर्माण होणार असून इथले कर्मचारी एस.पी.ठाकरे यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी निवड झाली आहे.
राजकारण, समाजकारण, साहित्य, काव्य अशा कोणत्याही क्षेत्रातील समस्या असो त्या सोडविण्यासाठी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे गिरीश लटके. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया.
मनमाडमधील ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था’ संचलित ‘मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ अर्थात ‘इंडियन हायस्कूल’ आज ३ जुलै रोजी ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त...
कोरोनाचे मूळ हे वुहानमध्येच होते, याचा ऊहापोह गेल्या दोन भागांमध्ये आपण केला. या विषाणूच्या प्रसाराला जबाबदार कोण याचीही माहितीही मागील भागांमध्ये जाणून घेतली. आजच्या भागात महामारीच्या काळात चीनचा निर्माण झालेला दबदबा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य मानल्या जाणार्या फार्मा कंपन्यांनी महामारीचा कसा फायदा घेतला, याबद्दलची माहिती या लेखातून घेणार आहोत.
भावीपिढीला पोहण्याच्या क्रीडाप्रकारात तरबेज करण्यासाठी पदरमोड करून कार्य करणारे मनमाड येथील दत्तात्रय पगार यांच्याविषयी...
नाशिक जिल्ह्यातील १,४६९ दुकाने रेशनच्या प्रतिक्षेत आहेत. कारण, पंजाबमधील किसान आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील धान्य वितरण यंत्रणेला सध्या बसला आहे.
चांदवडमध्ये 'पाणी फाउंडेशन' अभियानाचे काम करणाऱ्यांवर आदिवासी जमावाने हल्ला केला.
मनमाड शहरात लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारात महायुतीने आघाडी घेतली असून येत्या 29 एप्रिल रोजी होणार्या लोकसभेच्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ मनमाड शहरात प्रचार रॅलीने झाला.
मनमाड शहर काँग्रेसचा धनराज महाले यांच्या प्रचारावर बहिष्कार
निस्वार्थी दानाची परंपरा जपणाऱ्या मोजक्याच अपवादापैकी मोहनराव सोमन होते. संघकार्यासाठी राहते घर त्यांनी दान केले होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन.
मनमाड व पाणीटंचाई हे जणू समीकरणच बनले आहे. पण यावेळेस मात्र ही परिस्थिती जलवाहिन्यांची योग्य ती निगा न राखल्याने ओढवली आहे.
गेली नऊ दशकं अखंडपणे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असलेल्या, मुंबई-पुणे या महाराष्ट्राच्या आर्थिक व सांस्कृतिक राजधान्यांना जोडणार्या आणि पर्यायाने मुंबई-पुणे मार्गाची शान समजल्या जाणा-या ‘डेक्कन क्वीन एक्सप्रेस’ची शान आता आणखी वाढली आहे. आतापर्यंत या रेल्वेगाडीची खानपान सेवा, गाडीचा वक्तशीरपणा, प्रवासादरम्यान खंडाळ्याच्या घाटाचं विहंगम दृश्य, या गाडीने नित्यनेमाने ये-जा करणारे प्रवासी इ. वैशिष्ट्ये आपणा सर्वांनाच माहीत होती. परंतु, आता ही गाडी आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी ओळखली जाणार आहे, ते म्हणजे ग्रंथा
मनमाड-अंकाई दरम्यान सात ते आठ दरोडेखोर रेल्वेत घुसले. प्रवाशांना मारझोड करत महिला प्रवाशांचे ७ ते ८ लाखांचे दागिने लुटले.
मनमाडमध्ये बस आणि कंटेनरची धडक, ६ प्रवासी जागीच ठार
गेल्या काही वर्षांपासून अधिकारीवर्गात स्वतःला मिरवून घेण्याची सवय लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानका जवळ १० रोजी रात्री २ वाजेला गाडी क्र. १२८०९ मुंबई-हावडा मेल व्हाया नागपूर या गाडीचे तीन डबे रुळावरुन घसरले.सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही. त्यामुळे या मार्गावरुन धावणार्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. सकाळी ६ वाजेला रेल्वे मार्ग सुरळीत झाला.
मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी, ८ मे रोजी नवीन आणि जुन्या पादचारी पुलाच्या कामानिमित्त सकाळी ७.२५ ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.