interest

कोकणात सॅटेलाईट टॅग केलेल्या चौथ्या कासवाचीही प्रवासयात्रा थांबली

'सावनी' नंतर आता गुहागर किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'रेवा ' या मादी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा 'लोकेशन सिग्नल' २२ जून रोजी बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरची बॅटरी संपल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. गुहागर पासून मंगळूरच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. 'रेवा'ने आतापर्यंत २३२८ किमीचे अंतर कापले, तर ३३० मीटर पर्यंत खोल डुबकी मारली होती. 'रेवा'चे शेवटचे स्थान कारवार, कर्नाटकच्या किनाऱ्यापासून ९० किमी अंतरावर होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121