मालदीव संसदेतही पाकिस्तान बेइज्जत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2019
Total Views |




मालदीव
: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभर झाला आहे. पाकिस्तान या विषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु त्याची प्रत्येक युक्ती आणि प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत. या प्रयत्नात पाकिस्तानला आता मालदीवने देखील जोरदार चपराक लावली आहे.


मालदीवमध्ये सध्या
'दक्षिण आशियाई देशांची परिषद सुरू आहे. ही दक्षिण आशियाई देशांच्या संसद अध्यक्षांची चौथी शिखर परिषद आहे. या परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी पाकिस्तानी प्रतिनिधीच्या प्रश्नाला मध्येच रोखले आणि म्हणाले की, काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब आहे. यावर इतर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. तसेच हरिवंश यांनी पाकिस्तानवर कडक शब्दात टीका केली आणि म्हणाले की, जो देश आपल्या नागरिकांवर अत्याचार करतो त्याने मानवी हक्कांचा सल्ला देऊ नये. या विषयावर मालदीवनेही भारताचे समर्थन केले. तसेच काश्मीरबाबत पाकिस्तानी प्रतिनिधीने केलेली सर्व विधाने रेकॉर्डमधून काढून टाकली जातील,असे भारताला आश्वासन मालदीवच्या सभापतींनी दिले


भारताच्यावतीने राज्यसभेचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेला उपस्थित आहेत. पाकिस्तानच्या वतीने
, राष्ट्रीय परिषदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी आणि सिनेट सदस्य कुरात अल ऐन या परिषदेत भाग घेण्यासाठी उपस्थित आहेत. याखेरीज अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांच्या संसदेच्या अध्यक्षांनीही या परिषदेसाठी सहभाग दर्शविला आहे.

@@AUTHORINFO_V1@@