नवी दिल्ली: सुमारे ११० दिवसांच्या अंतरानंतर, भारतात कोरोनावायरसचे १२,००० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आले. तसेच, दैनंदिन प्रकरणांमध्ये ३८.४ टक्के वाढ नोंदवली गेली. देशभरात सक्रिय प्रकरणांमध्ये ५८,२१५ पर्यंतची वाढ नोंदवली गेली आहे. भारतातील कोविड-१९ प्रकरणांची एकूण संख्या ४,३२,५७,७३० वर पोहोचली आहे. तर ११ मृत्यूंसह मृतांची संख्या ५,२४,८०३ वर पोहोचली आहे.
एकूण संक्रमणांपैकी ०.१३ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रात बरे होण्ऱ्याचे दर ९८.६५ टक्के नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दैनिक सकारात्मकता दर २.३५ टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक सकारात्मकता दर २.३८ टक्के होता. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,२६,७४,७१२ वर पोहोचली आहे तर मृत्यूचे प्रमाण १.२१ टक्के नोंदवले गेले आहे. सरकारने जनतेला अधिक सावध राहायला सांगितले आहे.