गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरणात वाढ झाल्याने, अनेक नागरिकांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली. त्यातून जसा लाभ झाला, तसे काही तोटेही झाले. वाहतुकीची समस्या ही त्यापैकीच एक! पुण्यासारख्या शहरात ही समस्या आता उग्र होऊ लागली आहे. पुण्यातील वाहतूक समस्यांवर अधिकाधिक झोत टाकून, येथील सर्वच प्रकारच्या माध्यमांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. ‘पीएमपी’ची अवस्था अतिशय वाईट आणि प्रवाशांना त्रास होईल, अशी असल्याचे गेल्या वर्षभरापासून दिसत आहे.
Read More
पुणे महानगरात आजकाल हवामानाचे रंग दिवसेंदिवस अगदी सरडा रंग बदलतो, तसे बदलत आहेत. येथील वेधशाळा कधी पावसाचा तर कधी तापमानवाढीचा अंदाज देऊ लागल्याने टीव्हीवरील बातम्यांतून जसे राजकीय नेते आपले वक्तव्य बदलत असतात किंवा आजकाल हवे तसे त्यांचे वक्तव्य बदलवून ‘नॅरेटिव्ह’ सेट केले जात असतात, तशीच संभ्रमनिर्मिती या वातावरणाने केलेली दिसते.
प्रकाश पाटील हे मूळचे धुळ्याच्या तरवाडेचे. त्यांचे सर्व शिक्षण गावीच झाले. त्यानंतर सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. काही दिवस मुंबईत काम केल्यानंतर पुण्यात एका कंपनीत मुलाखतीसाठी आले आणि मग नोकरी मिळाल्यानंतर पुण्यातच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैद्याच्या पलायनाची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांच्या कारभाराइतकी किंवा कदाचित जास्तच चर्चा रुग्णालयाच्या कारभाराचीही झाली. पुण्यातील हे मोठे सार्वजनिक रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.
पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू करण्यात येत असल्याने आजपासून बाणेर रस्ता बंद करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह PMPMLची बससेवा बंद
पर्यावरणपूरक एसी इलेक्ट्रिक बस लवकरच पुणेकरांच्या सेवेत हजार होणार आहे. ही बस पुण्याच्या पेठांमधून सहज फिरू शकते असे सांगण्यात येत आहे.
पीएमपीएमएलची एमएच १४ सी डब्ल्यू ३०८८ ही बस वारजेजवळील उड्डाणपुलाहून चांदणी चौकाकडे जात होती