पुण्यामध्ये पीएमपीएमएलची बस पुलावरून उलटली

    02-Jul-2018
Total Views |



पुणे : पुण्यातील वारजे येथे पीएमपीएमएलची सार्वजनिक बस पुलावरून उलटल्यामुळे १० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील २ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य देखील सुरु करण्यात आले आहे. 

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पीएमपीएमएलची एमएच १४ सी डब्ल्यू ३०८८ ही बस वारजेजवळील उड्डाणपुलाहून चांदणी चौकाकडे जात होती. यावेळी बसमधून एकूण २० प्रवास करत होते. याच वेळी अचानकपणे चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस थेट उड्डाणपूलच्या कठड्याला धडकून पुलावरून उलटली. दरम्यान पुलाखाली असलेल्या एका घरावरच ही बस कोसळली. परंतु सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे मोठा प्रसंग टळला. यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत, बसमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. तसेच जखमी नागरिकांना तत्काळ उपचारासाठी म्हणून रुग्णालयात दाखल केले.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121