पुण्यात 'या' सेवा राहणार पूर्णतः बंद

    02-Apr-2021
Total Views | 173

pune_1  H x W:


पुणे :
महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढत कहर लक्षात घेता पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील. मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं असल्याची माहिती त्यांनी दिली.


पीएमपीएमएलची बससेवा राहणार बंद


पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील.


पुण्यात काय सुरु काय बंद?

- सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.

- मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद

- धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद

- PMPML बससेवा ७ दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु

- आठवडे बाजारही बंद

- लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

- संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

- दिवसभर जमावबंदी

- जिम सुरु राहणार

- दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार

- शाळा महाविद्यालये ३० एप्रिल पर्यंत बंद

- होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार

- लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद

- अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद

- सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार

- दिवसा जमाव बंदी तर रात्री संचार बंदी लागू राहणार

- शाळा, कॉलेज ३० एप्रिल पर्यंत सुरू राहणार, मात्र परीक्षा वेळेत होणार


सद्यस्थितीत पुण्यातील पॉझिटिव्ह रेट ३२ टक्के इतका आहे. देशात सर्वाधिक चाचण्या पुण्यात होत असून बेड वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. लस घेण्याची प्रक्रिया आणि देण्याची प्रक्रिया देशात सर्वात जास्त आहे. सध्या ५७ हजारापर्यंत लस देण्यात येत आहे, हा दर रोज एक लाखापर्यंत नेणार असून पुण्यात लसीकरणाचा वेग वाढविणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.तसेच ४०० मेडिकल स्टाफची तातडीने भरती करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
...
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121